भाचीच्या प्रेमात वेडापिसा झाला मामा! लग्न ठरल्यावर नराधमाने तरुणीच्या तोंडावर फेकलं ACID, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना

Today Shocking Viral News :  उत्तरप्रदेशच्या भदोही येथे धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथे राहणाऱ्या एका मामाने भाचीवर अॅसिड फेकलं. एकतर्फी प्रेमप्रकरणातून मामाने भाचीवर अॅसिड फेकल्याचं संतापजनक कृत्य केलं.

प्रतिकात्मक चित्र.

Today Shocking Viral News

मुंबई तक

• 05:07 PM • 01 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मामाने भाचीवर अॅसिड फेकलं

point

पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु 

point

त्या ठिकाणीही घडली होती धक्कादायक घटना

Today Shocking Viral News :  उत्तरप्रदेशच्या भदोही येथे धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथे राहणाऱ्या एका मामाने भाचीवर अॅसिड फेकलं. एकतर्फी प्रेमप्रकरणातून मामाने भाचीवर अॅसिड फेकल्याचं संतापजनक कृत्य केलं. ही घटना भदोहीच्या औराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका गावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेश त्याच्या भाचीवर एकतर्फी प्रेम करायचा. मागील काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीचं लग्न ठरलं होतं. मुकेशला याबाबत माहित झाल्यावर तो संतापला. तो तिचं लग्न मोडण्यासाठी प्रयत्न करू लागला. आरोपी मुकेश रविवारी सकाळी तरुणीच्या घरी गेला. त्यावेळी तरुणी घरी झोपली होती.

हे वाचलं का?

मामाने भाचीवर अॅसिड फेकलं

आरोपी मुकेशने खिडकीतून तरुणीवर अॅसिड फेकलं आणि शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि तो तिथून फरार झाला. चेहरा आणि हातावर अॅसिडवर अॅसिड फेकल्यानंतर तरणीने आरडाओरडा केला. तरुणीचा आवाज ऐकल्यानंतर कुटुंबियांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तरुणीचं शरीर जळल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

हे ही वाचा >> Maratha Reservation: 'मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे घडतं आहे', सदावर्तेंचा हायकोर्टात खळबजनक दावा

पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु 

कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुकेशचा शोध सुरु केला आहे. वाहनांची तपासणी सुरु असताना पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपी मुकेशने पोलिसांवर फायरिंग केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये आरोपीच्या पायाला गोळी लागली. त्यानंतर जखमी झालेल्या मुकेशला पोलिसांनी अटक केली. आरोपी मुकेशवर औराई सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. दरम्यान, पोलिसांकडून याप्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. 

त्या ठिकाणीही घडली होती धक्कादायक घटना

उत्तरप्रदेशच्या औरेयामध्ये एक संतापजनक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. नराधम मामाने त्याच्या 17 वर्षांच्या भाचीसोबत घाणेरडं कृत्य केलं होतं. पीडित मुलगी मैनपुरी जिल्ह्यातील ओछा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत होती. 65 वर्षीय आरोपी भुरे सिंगने घरात एका रुममध्ये भाचीसोबत अत्याचार केला. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला 6 मामा आहेत. तिच्यासोबत तिसऱ्या नंबरच्या मामाने रेप केला. पीडित मुलीच्या दुसऱ्या मामाच्या मुलाने पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या काकाविरोधात तक्रार दाखल केली होती. 

हे ही वाचा >> 'मुंबईत मोर्चाला जायला पैेसे नाहीत मी घरीच...' नैराश्यात येऊन आणखी एका मराठा तरुणानं औषध पिऊन उचललं टोकाचं पाऊल

    follow whatsapp