Beed Crime : बीडचा बिहार झाला आहे का? असा उपरोधिक सवाल आता राज्यभरातून विचारला जात आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे. अशातच आता बीड जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका 5 वर्षीय मुलीचं परळी रेल्वे स्थानकावर लैंगिक शोषण करण्यात आलं आहे. पीडित मुलीचे आई बाबा विश्रांतीसाठी बसले असताना मुलीवर लैंगिक शोषण करण्यात आले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : गजकेसरी राजयोगाच्या निर्मितीचा काही राशींवर चांगला परिणाम, पैशांची कमी कधीच भासणार नाही
नेमकं काय घडलं?
घडलेल्या एकूण घटनेनुसार, पंढरपूर येथून पीडितेचे आई-वडील हे आपल्या पाच वर्षाच्या मुलीला घेऊन कामानिमित्त परळीला आले होते. पहाटेच्या सुमारास रेल्वे परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर पोहोचली. त्यानंतर पीडित मुलीचे आई - वडील आणि त्यांची 5 वर्षांची चिमुकली असे संपूर्ण कुटुंब रेल्वे स्थानाकात उतरले. त्यानंतर प्रवासानंतर थोडी विश्रांती घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता.
आई वडील विश्रांतीसाठी थांबले अन्...
विश्रांती घेण्यासाठी थांबलेल्या कुटुंबातील आई आणि वडिलांना गाढ झोप लागली असता, नराधमांनी त्यांच्या मुलीला एका अज्ञात ठिकाणी नेले आणि तिचं लैंगिक शोषण केल्याचं समोर आलं. काही वेळानंतर आई वडिलांना जाग आली असता, आपली चिमुरडीच आपल्याजवळ नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी मुलीची शोधाशोध केली. त्याचक्षणी लहान मुलीचा आवज येऊ लागला होता. तेव्हा काही लोक त्या मुलीकडे गेले असता त्यांना मुलगी दिसली. तेव्हा मुलीचा रक्तस्त्राव होत असल्याचं उपस्थितांनी सांगितलं.
हे ही वाचा : अमेरिकेतील 'ही' महिला भारतात झाली स्थायिक अन् सोडल्या 'या' 3 गोष्टी... सोशल मीडियावर होतंय प्रचंड कौतुक
या घटनेची माहिती पोलिसांना देताच घटनास्थळावरील परळी येथील संभाजीनगर पोलीस ठाण्याते कर्मचारी आले आणि त्यांनी चिमुकलीला घेतलं आणि परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते. संबंधित प्रकरणाचा तपास संभाजीनगरचे पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
