मैनपुरी (उत्तर प्रदेश): भाऊ आणि बहीण हे नातं अत्यंत जवळचं आणि प्रचंड आपुलकीचं असतं. मात्र, उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे एका बहिणीनेच आपल्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहित असूनही पूजा दुबे ही अनैतिक संबंधांना चटावली होती. पण याच कारणमुळे तिने तिचा सख्खा भाऊ करण मिश्रासोबत जे केले, त्याने सर्वांना धक्का बसला आहे. असा आरोप आहे की, पूजाने तिचा प्रियकर जितेंद्रसोबत कट रचून आपल्या सख्ख्या भावाची म्हणजेच करण मिश्रा याची निर्घृण हत्या केली.
ADVERTISEMENT
भाऊ करण तर आलेला पूजाला घरी सोडायला, पण...
मैनपुरीच्या किशनी भागातील कुसमारा येथे ही संपूर्ण घटना घडली आहे. पूजा दुबे तिथे तिच्या पतीसोबत राहत होती. त्यांना एक मूलही होते. मात्र, पूजाचे जितेंद्र नावाच्या एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी पूजा तिच्या माहेरी आली होती. त्यानंतर काही दिवसांनी पूजाचा भाऊ करण मिश्रा हा तिला सासरी सोडायला गेला. पण त्यानंतर करण मिश्रा हा घरी परतलाच नाही.
हे ही वाचा>> अशी बायको कुणाच्याही नशिबात येऊ नये! संपूर्ण प्रकरण वाचून उडेल थरकाप
पूजाने तिच्या आई-वडिलांना सांगितले की, 'करण तर मला घरी सोडून इथून निघून गेला. मला सोडून गेलेल्याला आता बराच वेळही झाला.' पूजाच्या या सांगण्यावर तिच्या घरच्यांचाही विश्वास बसला. पण, बराच वेळ झाला तरी करण हा घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबाने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण काही केल्या करण सापडत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी थेट पोलिसांकडे तो हरवल्याची तक्रार दाखल केली.
पण पूजाच्या मुलानेच सांगितलं स्वत:च्या आईबद्दलचं कटू सत्य उघड
तक्रार दाखल झाल्याने पोलीसदेखील करणचा शोध घेत होते. त्याच दरम्यान, पूजाच्या मुलाने अशी गोष्ट उघड केली की, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. पूजाला दोन मुले आहेत, पण तिच्या एका मुलाने संपूर्ण घटना पाहिली होती. मुलाने सांगितले की, 'मामा रात्रीच्या सुमारास आईला घेऊन घरी आला होता. त्याचवेळी जितेंद्रही तिथे उपस्थित होता. अचानक जितेंद्रने करणवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर करण जितेंद्रचा मृतदेह सोबत घेऊन गेला.' पूजाच्या मुलाने पुढे हेही सांगितलं की, संपूर्ण घटनेदरम्यान त्याची आई पूजा ही देखील जितेंद्रसोबतच होती. त्यानंतर पोलिसांनी पूजा आणि जितेंद्र यांना ताब्यात घेतले. कसून चौकशीनंतर जितेंद्रने खुनाची कबुली दिली.
हे ही वाचा>> "तू काळा आहेस, माझ्या लायकीचा नाहीस...", पत्नीला सौंदर्याचा गर्व; अन् हत्येसाठी 1 लाख रुपयांची सुपारी
पोलिसांनी मृतदेह घेतला ताब्यात
संपूर्ण घटनेबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, "जितेंद्रने करणवर गोळी झाडली आणि त्याचा मृतदेह धर्मगडपूर गावाजवळील झुडपात फेकून दिला होता. जो आता ताब्यात घेण्यात आला आहे. गोळी डोक्यात लागली होती. मृत करण हा विवाहित असून त्याला 3 मुले आहेत."
एसपी सिटी अरुण कुमार सिंह यांनी सांगितले, "आरोपी जितेंद्र आणि पूजा यांचे प्रेमसंबंध होते, ज्यामुळे हा गुन्हा घडला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत."
ADVERTISEMENT











