शाळकरी मुलाच्या रफ वहीने उलगडले हत्येचे गुपित, रील स्टारचे दोन प्रियकर अन् मोठं कांड

मुंबई तक

15 May 2026 (अपडेटेड: 15 May 2026, 12:18 PM)

MP Crime News : सोशल मीडियावरील ग्लॅमरस आयुष्य आणि दोन प्रियकरांच्या वादातून घडलेल्या एका भयानक हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला असून रीना किरारसह तिच्या साथीदारांना अटक केली आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शाळकरी मुलाच्या रफ वहीने उलगडले हत्येचे गुपित

point

रील स्टारचे दोन प्रियकर अन् मोठं कांड

MP Crime News : मध्य प्रदेशच्या गुन्हेगारी जगतात सध्या रीना किरार या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर ग्लॅमरस रील बनवून प्रसिद्धी मिळवणाऱ्या रीनाचे वास्तव एखाद्या डार्क थ्रिलर चित्रपटासारखे भयावह असल्याचे समोर आले आहे. नरसिंहपूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात जन्मलेली रीना, जिचे आई-वडील लहानपणीच वारले होते, तिचे आयुष्य लग्झरी लाईफ, दोन प्रियकर आणि फसवणुकीच्या जाळ्यात अडकले होते. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी लग्न होऊनही तिचे मन पतीमध्ये रमले नाही आणि ती तिचा जुना प्रियकर अरुण पटेल याच्याकडे परतली. अरुणने तिच्यावर संपत्तीचा वर्षाव केला, मात्र त्याच वेळी राजस्थानच्या वीरू जाट या दुसऱ्या प्रियकराची तिच्या आयुष्यात एन्ट्री झाली आणि इथूनच एका खळबळजनक हत्याकांडाची स्टोरी लिहिली गेली.

हे वाचलं का?

हेही वाचा : जावयाने सासरवाडीतच केलं कांड, मेहुण्याला दारु पाजली अन्..., नेमकं कारण काय?

शाळकरी मुलाच्या रफ वहीने उघडले हत्येचे गुपित

राजस्थानचा रहिवासी असलेल्या वीरू जाटची हत्या अत्यंत नियोजित पद्धतीने करण्यात आली होती. 7 मे रोजी रायसेन जिल्ह्यात एका बोरीमध्ये वीरूचा मृतदेह सापडला, ज्याचे हात बांधलेले होते आणि तोंडावर टेप चिकटवलेला होता. मृतदेहाजवळ सापडलेल्या एका स्कूल बॅगेतील रफ वहीने या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. त्या वहीवर शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या होत्या, ज्याचा मागोवा घेत पोलीस नरसिंहपूरच्या साईंखेडा येथील शाळेत पोहोचले. ती वही रीना किरारच्या 10 वर्षांच्या मुलाची असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी रीना, अरुण आणि त्यांच्या एका साथीदाराला उज्जैनमधून बेड्या ठोकल्या.

हेही वाचा : जालना : चेहरा, छाती, गळा, हात काहीच सोडलं नाही, प्रेमात पडल्याने 18 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

आलिशान जीवनशैली आणि कोट्यवधींची मालमत्ता

रीना किरारला महागड्या वस्तू आणि आलिशान जीवन जगण्याची प्रचंड हौस होती. 3 वर्ष लग्न होऊन एका मुलाची आई असलेल्या रीनाचा जुना प्रियकर अरुण पटेल याने तिला करोडो रुपयांच्या एफडी, 45 लाख रुपयांचे घर, 670 ग्रॅम सोन्याचे दागिने, लक्झरी कार आणि महागडे मोबाईल फोन दिले होते. तिच्या इन्स्टाग्राम रीलमधून या श्रीमंतीचे प्रदर्शन नेहमीच व्हायचे. मात्र, वीरू जाटशी तिची वाढलेली जवळीक अरुणला खटकू लागली होती. वीरू रीनाशी सोशल मीडियावरून जोडला गेला होता आणि वारंवार तिला भेटण्यासाठी नरसिंहपूरला येत असे. यातूनच वीरूला वाटेतून बाजूला करण्याचा कट रचण्यात आला, ज्याचे पर्यवसान एका निर्घृण हत्येत झाले.

बेसबॉल बॅटने हल्ला करून वीरू जाटचा केला खात्मा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रीनाने वीरूला भेटण्याच्या बहाण्याने घरी बोलावले होते. तिथे आधीच अरुण आणि त्याचा एक साथीदार दबा धरून बसले होते. वीरू घरात येताच त्याच्यावर बेसबॉल बॅटने भीषण हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. हत्येनंतर ओळख लपवण्यासाठी मृतदेह बोरीत भरून रायसेन येथील एका पुलावरून 40 फूट खाली फेकून देण्यात आला. मात्र, नियतीने एका लहान मुलाच्या वहीच्या रूपाने पुरावा सोडला होता. सध्या या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, सोशल मीडियावर या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली आहे. पोलीस आता या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

जालना : चेहरा, छाती, गळा, हात काहीच सोडलं नाही, प्रेमात पडल्याने 18 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या