दारूसाठी पैसे देण्यास पत्नीचा नकार, नवऱ्याची सटकली अन् लहान लेकरांसमोर गळा दाबत...थरकाप उडवणारी घटना

मुंबई तक

24 Jun 2025 (अपडेटेड: 24 Jun 2025, 07:46 PM)

Mumbai Crime news : मुंबईतील गोरेगाव पश्चिम भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने दारू पिण्यासाठी पत्नीकडे पैशांची मागणी केली होती. पण पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीची हत्या केली आहे.

Mumbai Crime news

Mumbai Crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

क्षुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या

point

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Mumbai Crime news : मुंबईतील गोरेगाव पश्चिम भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने आपल्याच पत्नीची हत्या केली आहे. हत्येचं कारण ऐकून आपणंही हादरून जाल. पतीने दारू पिण्यासाठी पत्नीकडे पैशांची मागणी केली होती. पण पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने पतीने हत्या केली आहे. ही घटना रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणात बांगूर पोलिसांनी आरोपी वसीम शेखच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

हे वाचलं का?

हेही वाचा : मित्राचे पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचा पतीला संशय, थेट विटेनं ठेचून केलं ठार

घटनेचा घटनाक्रम

आरोपी वसीम, त्याची पत्नी गौशिया आणि दोन मुलं असं त्याचं कुटुंब गोरेगावच्या पश्चिम भागात राहत होतं. वसीमला दारूचे व्यसन होते. सोमवारी वसीमने आपली पत्नी गौशियाकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, त्यावेळी पत्नीने पैसे देण्यास नकार दिला. 

पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या वसीमने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढू लागला आणि वसीमने आपल्या लहान मुलांसमोर गौशियाचा गळा दाबून खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, या प्रकरणात वसीमने त्याच्या सासूला फोन करत माहिती दिली, त्यानंतर त्याने आपला मोबाईल बंद करून ठेवला होता. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तपासास सुरुवात केली. गौशियाच्या वडिलांनी बांगूर नगर पोलीस ठाण्यात वसीमविरूद्ध तक्रार दाखल केली असता, आरोपीचा शोध सुरु झाला. दरम्यान, दोन तासानंतर पोलिसांनी वसीमला राम मंदिराच्या रेल्वेस्थानकाजवळ अटक केली आहे. 

हेही वाचा : रुग्णालयात तरुणीवर सुरू होते उपचार, शौचालयासाठी उठली अन् रुग्नाने तिला खोलीत नेलं...

अशातच आता आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.