मित्राचे पत्नीसोबत अनैतिक शारीरिक संबंध असल्याचा संशय, पतीने मित्रालाच ठेचून केलं ठार

मुंबई तक

Crime News : मित्राचे आपल्याच पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचा पतीला संशय आला होता. त्यामुळे मित्राने आपल्याच मित्राचा खून केला अशी माहिती समोर आली. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.  

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ग्रेटर नोएडा येथे धक्कादायक घटना

point

पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मित्राचा खून

Crime News: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी खून केलेल्या आरोपीला अटक केली आहे. ही घटना रविवारी रात्री नॉलेज पार्क येथे घडली आहे. मित्राच्या खूना मागचं कारण समोर आलं आहे. मित्राचे आपल्याच पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचा पतीला संशय आला होता. त्यामुळे महिलेच्या पतीने आपल्याच मित्राचा खून केल्याची माहिती समोर आली.

हेही वाचा : रुग्णालयात तरुणीवर सुरू होते उपचार, शौचालयासाठी उठली अन् रुग्नाने तिला खोलीत नेलं...

नेमकं प्रकरण काय? 

या प्रकरणात अतिरिक्त पोलीस उपायुक्त सुधीर कुमार यांनी माहिती दिली की, बिहारचे रहिवासी असलेल्या गोलू कुमार आणि हरिमोहन हे त्या ठिकाणी मजूरी करायचे. त्या दोघांनाही दारूचं व्यसन होतं. ते दारू पित असताना हरिमोहनने गोलू कुमारवर पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला होता, त्यानंतर त्यांच्यात वादाला तोंड फुटले. दोघांमधील वाद विकोपाला गेला असता, हरिमोहनने गोलूच्या डोक्यात विट फेकून मारली आणि घटनास्थळावरून पळ काढला. 

संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी कुमारला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणात हरिमोहनला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

याच घटनेची पुनरावृत्ती

दोन महिन्यापूर्वी नोएडामध्ये अशीच एक घटना घडली होती. एका व्यक्तीने प्रेमसंबंधाच्या संशयावरून पत्नीचीच हत्या केली होती. नोएडाच्या ठाणे फेज-1 परिसरातील सेक्टर 15 मधील खळबळजनक घटना आहे. एका व्यक्तीने प्रेमसंबंधाच्या संशयावरून आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. 

हेही वाचा : 29 जूनपासून लक्ष्मी राजयोगाची सुरुवात, 'या' राशींच्या लोकांचे भाग्य चमकेल

आरोपीने पत्नीच्या डोक्यात हातोड्याने हल्ला करत तिचा गळा चिरून हत्या केली. यानंतर आरोपीने सांगितलं की, पत्नी नेहमीच मोबाईल फोन वापरायची. त्यामुळे पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. पत्नी झोपली असताना संधी साधून पतीने तिच्यावर हल्ला केला. त्यात तिचा मृत्यू झाला होता. 

हे वाचलं का?

    follow whatsapp