“माझी पत्नी मला त्रास देते....” तरुणाने व्हिडीओ बनवला अन् थेट ट्रेनखाली उडी... नेमकं काय घडलं?

एका पतीनेच त्याच्या पत्नीच्या वागण्याला कंटाळून आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तरुणाने व्हिडीओ बनवला अन् थेट ट्रेनखाली उडी...

तरुणाने व्हिडीओ बनवला अन् थेट ट्रेनखाली उडी...

मुंबई तक

• 10:27 AM • 22 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणाने व्हिडीओ बनवला अन् थेट ट्रेनखाली उडी...

point

पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने उचललं टोकाचं पाऊल

Suicide Case: पतीच्या छळाला वैतागून पत्नीने आत्महत्या केल्याच्या बऱ्याच घटना घडल्याचं पाहायला मिळतं. मात्र, कर्नाटकच्या रामनगरमधून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. येथे एका पतीनेच त्याच्या पत्नीच्या वागण्याला कंटाळून आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पतीने आपल्या पत्नीच्या वाईट कृत्यांबद्दल सांगितलं आहे. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

हे वाचलं का?

संबंधित प्रकरण हे बिदादी परिसरातील असल्याची माहिती आहे. येथे पत्नीचा छळ सहन न झाल्याने एका पतीने आत्महत्या केली. प्रकरणतील मृताचं नाव रेवंत कुमार असल्याचं सांगितलं जात आहे. पीडित तरुण हा बिदादी येथे एका कारखान्यात काम करत होता आणि त्याचं 5 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं.

हे ही वाचा: दिराने असं काय केलं की वहिनीला त्याचं गुप्तांगच कापावं लागलं? धक्कादायक खुलासा

“पत्नीचा छळ सहन करू शकत नाही...” 

मंगळवारी पीडित रेवंतने एक व्हिडिओ बनवत त्याने त्याची पत्नी मल्लिका हिच्यावर गंभीर आरोप केले. व्हिडिओमध्ये तो म्हणाला की, "हॅलो, माझं सर्वांनी ऐका. माझ्या मृत्यूसाठी माझी पत्नीच जबाबदार असेल. कारण लग्न झाल्यापासून ती मला खूप त्रास देत आहे. आज मी स्वत:चं आयुष्य संपवणार आहे, कारण मी तिचा छळ सहन करू शकत नाही. तिच्यामुळे माझं कामातही नीट लक्ष लागत नाही आणि मी आता जगू शकत नाही.”

हे ही वाचा: Personal Finance: प्रचंड स्वस्तात मिळतील विमान तिकिटं, 'हे' 6 क्रेडिट कार्ड आहेत बेस्ट

ट्रेनसमोर उडी मारली 

रेवंत पुढे म्हणाला, "मला वाटलं होतं की ती सुधारेल. पण ती माझा दिवसेंदिवस जास्त छळ करत आहे. तिचा छळ सहन करून मी वैतागलो आहे. मी आज इथे मरण्यासाठी आलो आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे. मी मेल्यानंतर माझ्या पत्नीला शक्य तितकी कठोर शिक्षा झाली पाहिजे. तिने मला खूप दु:ख दिलं आहे. तिच्याही वाट्याला असंच दु:ख यावं, असं मला वाटतंय.” व्हिडीओ बनवल्यानंतर रेवंत कुमारने समोरून येणाऱ्या ट्रेनसमोर उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आता प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

    follow whatsapp