नवी मुंबईतील आंबेडकर नगर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. 30 वर्षीय कालिदास वाघमारे याच्या अपहरण आणि हत्येची घटना घडली होती. याप्रकरणी त्याची 28 वर्षीय पत्नी आणि तिचा प्रियकर 24 वर्षीय सुरेश हरिप्रसाद यादव यांना पोलिसांनी अटक केली आहे. कालिदास हा मद्यपी असून, नशेत पत्नीला मारहाण करायचा, त्यामुळे ती वैतागली होती. सुदैवानं, कालिदास या घटनेतून बचावला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> अटक केली की आरोपी स्वत:हून हजर झाले? सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले 3 सवाल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला कालिदास बेपत्ता झाल्यानं हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. मात्र, तपासात सत्य बाहेर आल्यानं हे प्रकरण कट रचल्याच्या प्रकरणात बदललं. 16 मे रोजी आरोपी सुरेशने कालिदासला घराची चावी देण्याच्या बहाण्याने बाहेर बोलावलं होतं. दोघांनी काही वेळ गप्पा मारल्या, त्यानंतर सुरेशने कालिदासला आपल्या ऑटोरिक्षात बसवून त्याला दारू पाजली. नंतर त्याला ठाणे शहरातील बालकुम परिसरात मारहाण करुन सोडून दिलं.
हे ही वाचा >> राजेंद्र हगवणेला अटक, पोलिसांना कसा आणि कुठे सापडला? सोबत सुशील हगवणेही...
दरम्यान, कालिदास घरी परत न आल्यानं पत्नीने निर्दोष असल्याचं भासवण्यासाठी पोलिसांत तक्रार दाखल केली. पण, पोलीस तपासात सत्य उघड झालं. 21 मे रोजी याप्रकरणी एफआयआर दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT
