"प्राचार्याकडून जातीवाचक शिवीगाळ", विद्यार्थ्यानं वसतिगृहाच्या खोलीतच बेल्टने... नवी मुंबईत काय घडलं?

मुंबई तक

• 09:38 AM • 12 Jun 2025

पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, प्राचार्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पनवेलमध्ये महाविद्यालयात विद्यार्थ्यानं स्वत:ला संपवलं

point

जातीवाचक शिवीगाळ केल्याचा पालकांचा आरोप

Panvel Student Suicide : पनवेल तालुक्यातील पोयंगे गावातील एका खासगी महाविद्यालयात एक धक्कादायक घटना घडली. छत्रपती संभाजीनगर येथील एका बीएससी नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानं 3 जून रोजी वसतिगृहातील खोलीत गळफास आत्महत्या केली. या प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे.

हे वाचलं का?

महाविद्यालयाच्या प्राचार्याविरुद्ध मंगळवारी विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर विद्यार्थाने 3 जून रोजी वसतिगृहातील खोलीत कमरपट्ट्याने खिडकीच्या गजाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

"प्राचार्याकडून जातीवाचक शिवीगाळ"

मृत विद्यार्थ्याच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, प्राचार्याकडून गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्याला जातीवाचक शिवीगाळ केली जात होती. त्याचा इतरांसमोर अपमान केला आणि तसंच त्याच्याबद्दल अश्लील आणि अपमानास्पद टिप्पणी केली. या मानसिक छळाला कंटाळून विद्यार्थ्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप तक्रारीत आहे.

हे ही वाचा >>गार्डनमध्ये फिरायला गेले आणि तिथेच अंत झाला.... कमानीचा भाग कोसळून 2 महिलांचा मृत्यू, घटना काय?

पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, प्राचार्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि 352(1) (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणतीही अटक झालेली नाही.

हे ही वाचा >> सोनम बेवफा! राजाचा मृतदेह खोल दरीत कोणी फेकला? सर्वात मोठा खुलासा, सोनम अन् किलर्सने...

पोलीस अधिकारी म्हणाले, "आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. साक्षीदार आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत आणि सर्व आवश्यक पुरावे गोळा केले जात आहेत."