Online Game Case : ऑनलाईन गेमचा नाद खूपच वाईट असतो, याची प्रचिती ही राज्यातील राजकरणातही दिसून आली आहे. ऑनलाईन गेमचा नाद खूपच वाईट असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्ह्यात एका 86 वर्षीय आजीने नातवाला गेम खेळण्यास विरोध दर्शवला. आजीने नातवाला सांगितलेलं पटलं नाही, मग नातवाने आजीलाच संपवलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : घोर कलियुग! मी पहिल्या नवऱ्याकडे जाणार नाही, पत्नीनं नवऱ्यासह मुलीला सोडून दिलं अन् पुतण्याचा धरला हात
आरोपीचं नाव मनीष चुघने असे आहे, तर त्याच्या आजीचं नाव द्रौपदी असे आहे. नातू मनीषला ऑनलाईन गेम खेळण्याचा नाद आहे. ऑनलाईन गेम खेळण्यास आजी द्रोपदी नेहमी विरोध करायची. याच रागातून नातू मनीषने आपल्या आजीचाच जीव घेतला आहे. त्याने आपली आजी द्रौपदीच्या गळ्याला टॉवेलनं गळा दाबून हत्या केली आहे.
तो इथवरच न थांबता त्याने आपल्याच घरातील असलेले पैसे, दागिने, इतर मौल्यवान वस्तू लुटल्या आहेत. तथापि, पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर त्याने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला आहे. मोबाईल गेमिंगच्या व्यसनाने मनीषने पूर्वीच लाखो रुपये गमावले होते, अशी माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : सोलापूरातील नामांकित शाळेत 56 वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला पार्किंगमध्येच...नेमकं काय घडलं?
त्याने त्याच्या नातेवाईकांकडून कर्जही घेतलं होते. ज्या दिवशी त्याने हे कृत्य केलं होतं त्याच दिवशी त्याच्याकडून 15 हजार रुपये हरवले होते. आजीने त्याला अनेकदा ऑनलाईन गेम खेळवण्यावरून फटकारले. त्यानंतर रागाच्या भरात त्याने आजीची हत्या केली आणि घराकून रक्कम आणि मौल्यवान वस्तू पळवून नेल्या आहेत, संबंधित प्रकरणाच्या घटनेची माहिती ही हिंदुस्तान टाईम्स या वृत्तमाध्यमाने दिली आहे.
संबंधित घटनेची प्रश्न - उत्तरे
प्रश्न : आजीने कोणाला ऑनलाईन गेम खेळण्यास विरोध केला?
उत्तर : आजीने नातवाला ऑनलाईन गेम खेळण्यास विरोध केला
प्रश्न :आजीचा कोणी खून केला?
उत्तर : नातवानेच आजीचा खून केलाय
प्रश्न : ही घटना कुठं घडली होती?
उत्तर : राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्ह्यात घडली.
ADVERTISEMENT
