Pune News : पुण्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील यांचा विरुद्ध दिशेने वाहतूक करणाऱ्या इसमासोबत वाद झाला आहे. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पुण्यातील फडके हॉल परिसरात विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका हायब्रिड गाडीमुळे हा वाद ट्राफिक जाम झाल्यानंतर हा वाद उद्धवला. या संबंधी विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
रुपाली पाटील आक्रमक
पुण्यातील फडके हॉल परिसरात विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायब्रिड गाडीमुळे ट्राफिक जाम झाल्याचे कृष्णा खोब्रागडे यांनी आकाश पाटील यांना सांगितलं. मात्र या दोघांमध्ये वाद सुरु झाला. यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील त्याठिकाणी दाखल झाल्या. त्यांनी दोघांमधील वाद मिटवला. मात्र हा वाद मिटवताना त्या आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.
गुन्हा दाखल
या घटनेसंदर्भात पुण्यातील विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT











