नगर-दौंड महामार्गावर भरधाव आलेल्या ट्रकने कारला चिरडलं, भीषण अपघातात तिघांचा जागीच अंत

मुंबई तक

24 Feb 2026 (अपडेटेड: 24 Feb 2026, 05:22 PM)

Shrigonda Accident : श्रींगोंदा येथील नगर-दौंड महामार्गावरील कोळगाव शिवाराज पहाटे तीन वाजेच्याा सुमारास एक भीषण अपघात झाला. एका भरधाव आलेल्या ट्रकने एका कारला जागीच चिरडलं, या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या अपघातातील मृत्यू झालेल्या तिघांची नावे समोर आली आहे. 

Shrigonda Accident

Shrigonda Accident

Google CTA

बातम्या हायलाइट

point

अपघातात तिघांचा दुर्दैवी अंत 

point

दौंडहून नगरकडे जाणाऱ्या ट्रकने कारला चिरडले

Shrigonda Accident : श्रींगोंदा येथील नगर - दौंड महामार्गावरील कोळगाव शिवाराज पहाटे तीन वाजेच्याा सुमारास एक भीषण अपघात झाला. एका भरधाव आलेल्या ट्रकने एका कारला जागीच चिरडलं, या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या अपघातातील मृत्यू झालेल्या तिघांची नावे समोर आली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याहींवर भाजपने टाकली मोठी जबाबदारी, कोणतं पद दिलं?

अपघातात तिघांचा दुर्दैवी अंत 

या अपघातात नितीन कोकाटे (वय 22, रा. काष्टी, चालक), गजानन जनार्धन पायघन (वय 47), दुर्पा गजानन पायघन (वय 36) आणि वैभव गजानन पायघन (वय 19) अशी मृतांची नावे आहेत. याच अपघातात एक 13 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

दौंडहून नगरकडे जाणाऱ्या ट्रकने कारला चिरडले

पायघन कुटुंबातील सदस्या कामानिमित्त श्रींगोंदा तालुक्यातील चिंभळे गावात चालले होते. काष्टी येथील चालक नितीन कोकाटे याला घेऊन ते आपले मूळ गाव अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळतूर येथे गेले होते. 23 फेब्रुवारी रोजी रात्री ते पुन्हा चिंभळे येथे येण्यासाठी निघाले असता, पहाटे तीन वाजताच्या सुमारास कोळगाव शिवारातील माऊली मंदिर परिसरात त्यांची गाडी आली असता, दौंडहून नगरकडे जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली. 

हे ही वाचा : 'लग्नाला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, स्कार्फसह मृतदेह...' कुटुंबियांनी सांगितला घटनेचा थरार

ही धडक इतकी भीषण होती, इको गाडीचा चक्काचूर होऊन चौघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने गाडीत अडकून पडलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंजा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.