'लग्नाला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, स्कार्फसह मृतदेह...' कुटुंबियांनी सांगितला घटनेचा थरार
crime news : एक विद्यार्थीनी लग्नापूर्वी सुरु असलेल्या नातेवाईकांच्या कार्यक्रमात गेली होती. त्याच समारंभात ती पाण्याच्या पंपावर हात धुण्यासाठी गेली असता, पुन्हा परतलीच नाही. बराच वेळ कुटुंबियांनी शोध घेतला, त्यानंतर कुटुंबातील सदस्य बागेत पोहोचले. पण त्यांना मुलीचा मृतदेह स्कार्फने लटकलेल्या स्वरुपात झाडाला आढळून आलेला दिसला, या घटनेचा थरार संबंधित कुटुंबातील सदस्यांनी सांगितला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'मुलीवर सामूहिक अत्याचार', कुटुंबियांनी सांगितला घटनेचा थरार
नेमकं काय घडलं?
Crime News : एक विद्यार्थीनी लग्नापूर्वी सुरु असलेल्या नातेवाईकांच्या कार्यक्रमात गेली होती. त्याच समारंभात ती पाण्याच्या पंपावर हात धुण्यासाठी गेली असता, पुन्हा परतलीच नाही. बराच वेळ कुटुंबियांनी शोध घेतला, त्यानंतर कुटुंबातील सदस्य बागेत पोहोचले. पण त्यांना मुलीचा मृतदेह स्कार्फने लटकलेल्या स्वरुपात झाडाला आढळून आलेला दिसला, या घटनेचा थरार संबंधित कुटुंबातील सदस्यांनी सांगितला. ही घटना बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील असल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा : सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याहींवर भाजपने टाकली मोठी जबाबदारी, कोणतं पद दिलं?
'मुलीवर सामूहिक अत्याचार', कुटुंबियांनी सांगितला घटनेचा थरार
घडलेल्या घटनेनुसार कुटुंबियांनी सांगितलं की, त्यांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आणि नंतर तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संबंधित मृत तरुणी ही बीए चे शिक्षण घेत होती. ती मूळची जिल्ह्यातील किशनपूर पोलीस ठाणे परिसरातील एका गावातील रहिवासी होती. ती लहानपणापासून तिच्या आजोबांच्या घरी शिक्षण घेत होती.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सोमवारी स्थानिक पोलिसांसह जिल्हा फॉरेन्सिक टीम, सायबर पोलीस ठाणे पथक आणि डीआययू पथकाने घटनास्थळी धाव घेत पुरावे गोळा केले.
हे ही वाचा : पुणे : बिल्डरच्या फसवणुकीमुळे सेवानिवृत्त अधिकारी नैराश्यात, सातव्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन
घटनास्थळावरून मुलीच्या चप्पलाही जप्त केल्या आहेत. घटनेबाबत अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुलीच्या मृतदेहाची चौकशी सुरु आहे. एफएसएल आणि तांत्रिक पथकही तपासात सहभागी आहे. अर्ज मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. बलात्काराबाबत शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर खरं खोटं हे स्पष्ट होईल.










