Crime News : बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. लुधियाना येथील टिब्बा परिसरात एका नराधम पित्याने आपल्या 21 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी एका खाजगी महाविद्यालयात फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शिकत असून, तिने दिलेल्या तक्रारीनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घृणास्पद कृत्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पंजाबच्या लुधियानातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : आधी जावयासोबत अन् आता मेहुण्यासोबत पळाली; अनिताच्या प्रेमप्रकरणांची देशभर चर्चा
आईच्या अनुपस्थितीत साधली संधी
मूळचे बिहारचे असलेले हे कुटुंब लुधियाना येथे भाड्याच्या घरात राहते. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात तिची आई धाकट्या मुलाच्या परीक्षेनिमित्त गावी बिहारला गेली होती. घरात वडील आणि मुलगी दोघेच होते. आई गेल्यानंतर वडील वारंवार मद्यपान करून घरी येत असत आणि पीडितेवर शरीरसंबंधांसाठी दबाव टाकत असत. मात्र, 8 फेब्रुवारीच्या रात्री जेव्हा घरात कोणीही नव्हते, तेव्हा नराधम पित्याने मद्याच्या नशेत मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केला.
मैत्रिणींकडे मांडली व्यथा
या घटनेनंतर पीडित तरुणी प्रचंड धक्क्यात होती. दुसऱ्या दिवशी ती महाविद्यालयात गेली असता तिच्या मैत्रिणींना तिची अवस्था पाहून संशय आला. मैत्रिणींनी विचारपूस केल्यानंतर पीडितेचा बांध फुटला आणि तिने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. मैत्रिणींच्या पाठिंब्यामुळे तिने धाडस एकवटून 9 फेब्रुवारीच्या संध्याकाळी 181 या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली. हेल्पलाईनवरुन माहिती मिळताच महिला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पीडितेचा जबाब नोंदवून घेतला.
हे ही वाचा : सुनेवर वेश्या व्यवसायासाठी दबाव, सासर की दलालांचं घर? सुनेनं घेतला टोकाचा निर्णय
आरोपीचा शोध सुरु
पीडितेच्या तक्रारीवरून टिब्बा पोलीस ठाण्यात नराधम पित्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा घडल्यापासून आरोपी स्वतःला वाचवण्यासाठी फरार झाला असून पोलीस त्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत. 'अशा प्रकारच्या कृत्यामुळे समाजात नात्यांवरचा विश्वास उडत असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस वेगाने तपास करत आहेत,' असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ADVERTISEMENT











