Ganpat Gaikwad : भाजप आमदार गायकवाड गोळीबार; अहमदनगरमधून एकाला अटक

मिथिलेश गुप्ता

11 Feb 2024 (अपडेटेड: 11 Feb 2024, 01:03 PM)

Ganpat gaikwad : उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात घडलेल्या गोळीबार प्रकरणात ठाणे पोलिसांची मोठी कारवाई.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या चालकाला अटक.

Driver of ganpat Gaikwad has been arrested by thane police

follow google news

Ganpat Gaikwad Firing case updates : गोळीबार प्रकरणात अटकेत असलेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांना आणखी झटका बसला आहे. ठाणे पोलिसांनी फरार असलेल्या त्यांचा चालक रंजित यादव याला अटक केली आहे. (Thane Police Arrested Ranjeet Yadav, Driver of bjp mla Ganpat Gaikwad)

हे वाचलं का?

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याणचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात महेश गायकवाड जखमी झाले होते. त्यांच्या उपचार सुरू असून, गणपत गायकवाड हे सध्या अटकेत आहे. 

भाजप आमदाराच्या चालकाला अटक

उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात ही गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. 

गणपत गायकवाड यांना अटक केल्यानंतर त्यांचा मुलगा वैभव गायकवाड, चालक रंजित यादव आणि नागेश बडेकर हे फरार झाले होते. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध लुक आऊट नोटिसही जारी केलेली आहे. 

दरम्यान, रविवारी (11 फेब्रुवारी) गणपत गायकवाड यांचा चालक रंजित यादव याला दोघांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. ३६ वर्षीय रंजित यादव गणपत गायकवाडांचा जुना ड्रायव्हर आहे. १० वर्षांपासून तो त्यांच्याकडे कामाला आहे.  

5 जणांना अटक, 1 अद्यापही फरार

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले की, यादवला शनिवारी सायंकाळी अहमदनगर जिल्ह्यातून अटक करण्यात आली. त्याला उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 14 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

पोलिसांनी सांगितले की, त्याचे नाव एफआयआरमध्ये नाही, पण चौकशीत त्याचे नाव समोर आले होते. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात रंजित यादव गोळीबारानंतर केबिनमध्ये येऊन गणपत गायकवाडला संरक्षण देताना दिसत आहे. 

आतापर्यंत कुणाला झालीये अटक?

गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आधी आमदार गणपत गायकवाड, संदीप सरवणकर आणि गणपत गायकवाडांचा अंगरक्षक हर्षल केणे अशा तीन जणांना अटक केली होती. त्यानंतर व्यावसायिक भागीदार विक्की गणात्राला अटक करण्यात आली. आता चालक यादवला अटक केली असून, पोलीस त्यांचा मुलगा वैभव गायकवाड आणि इतर दोघांचा शोध घेत आहेत. 

    follow whatsapp