Crime News: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये प्रेमसंबंधातून अतिशय दु:खद घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेलं आहे. नेमकं प्रकरण काय? खरं तर, गावातील दिपांशूची त्याच गावातील 15 वर्षीय जोया (काल्पनिक नाव) नावाच्या तरुणीसोबत चांगली मैत्री होती. लहानपणापासून ते दोघे एकमेकांच्या घरी जायचे. कालांतराने त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. त्यानंतर, अल्पवयीन जोया दीपांशूसोबत लग्नाचं स्वप्न पाहू लागली.
ADVERTISEMENT
कुटुंबियांचा नात्याला विरोध
दोघेही गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांसोबत प्रेमसंबंधात होते, पण त्यांच्या कुटुंबियांना याबद्दल कळताच त्यांच्या नात्यात मोठा अडथळा निर्माण झाला. खरं तर, दोघांचे जात-प्रवर्ग वेगळे असल्याकारणाने आणि तरुणी अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना त्यांचे प्रेमसंबंध अजिबात मान्य नव्हते.
हे ही वाचा: मुख्याध्यापकाकडून शारीरिक छळ! 15 वर्षीय विद्यार्थीनीने शाळेतच फाशी घेत संपवलं आयुष्य, सुसाइड नोटमध्ये 'बॅड टच'...
प्रियकराच्या मृत्यूची अफवा
शुक्रवारी, जोयाच्या मामी पीडितेला गावातील महिला सरपंचाच्या घरी घेऊन गेली आणि तिला याबाबत समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, तरुणी अल्पवयीन असून तिने तिच्या प्रियकरासोबतचं नातं थांबवलं पाहिजे, असं तिला सांगण्यात आलं. मात्र, पीडिता त्यांचं म्हणणं समजून घेण्यास अजिबात तयार नव्हती. दरम्यान, दीपांशूने जंगलात गळफास घेतल्याची गावात बातमी पसरली. ही बातमी ऐकताच जोया अतिशय घाबरली. खरं तर, ही माहिती अपूर्ण होती. दीपांशूने केवळ आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण तो जिवंत होता आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
हे ही वाचा: मुंबई: मित्रांसोबत वाढदिवस साजरा करणं पडलं महागात! ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली अन्... तरुणासोबत घडलं भयानक
प्रेयसीने केली आत्महत्या
या व्हायरल बातमीनंतर, जोयाला अतिशय वाईट वाटलं, कारण दीपांशूचा मृत्यू झाल्याचं तिला वाटलं. तिने तिच्या प्रियकराला बघायला जाण्यासाठी आग्रह धरला. त्यानंतर, जोया घराबाहेर पडली. पण वाटेतच तिने गावातील सरपंचाच्या कार्यालयात स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीच्या मृत्यूनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला. जोयाच्या कुटुंबियांनी त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप केला. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT











