छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील बिल्डा फाट्याजवळ मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात भरधाव कारने पुलावरील दुभाजकाला धडक देऊन उलटल्याने हा अपघात घडला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> "काढ व्हिडीओ, मी नाही घाबरत...", वकिलांशीही अरेरावी, ट्राफिक पोलीस कॉन्स्टेबलचा दुसरा व्हिडीओ
तिघांचा जागीच मृत्यू
मृतांमध्ये सय्यद मारुफ सय्यद माजेद (वय 18), अरफात बागवान (वय 20) आणि रेहान सय्यद (सर्व रा. मोतीलालनगर, छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे. तर, सय्यद उजेफ आणि शेख शारीक हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाचही मित्र जेवणासाठी ढाब्यावर गेले होते अशी माहिती समोर आली.
दुभाजकाला धडकून कार उलटली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेले पाच जण कार (क्र. एमएच 20 इ जे 1586) ने फुलंब्रीहून छत्रपती संभाजीनगरकडे येत होते. रात्री 11 वाजेच्या सुमारास बिल्डा फाट्याजवळच्या पुलावर त्यांच्या भरधाव कारने दुभाजकाला जोरदार धडक दिली आणि कार उलटली. या अपघाताची माहिती मिळताच फुलंब्री पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय सहाणे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं.
हे ही वाचा >> एक्सप्रेसवेवर महिला आणि नेता न्यूड अवस्थेत, व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
दरम्यान, या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ADVERTISEMENT
