सना खान हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! पतीबरोबर आणखी एकाचा सहभाग, कोण आहे तो?

योगेश पांडे

• 08:39 AM • 13 Aug 2023

भाजप अल्पसंख्याक महिला मोर्चाच्या पदाधिकारी सना खानची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पती अमित साहू उर्फ पप्पू याच्याबरोबर आणखी एकाचा समावेश आहे.

Twist in BJP leader Sana Khan murder, apart from husband, one more person is involved in the murder

Twist in BJP leader Sana Khan murder, apart from husband, one more person is involved in the murder

follow google news

Sana Khan News : महाराष्ट्रातील भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या सरचिटणीस सना खान जबलपूरमधून बेपत्ता झाल्या. पोलिसांत तक्रार आली आणि तपास सुरू झाला. त्यानंतर सना खानची हत्या करण्यात आल्याचे तपासातून पुढे आले. या प्रकरणी जबलपूर आणि नागपूर पोलिसांनी आरोपी अमित उर्फ पप्पू साहूला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, अमितने सना खानची हत्या केल्याची कबुली दिली.

हे वाचलं का?

आरोपी अमित उर्फ पप्पू साहू याने पोलिसांना सांगितले की, सना खानची रॉडने वार करून हत्या केली. यानंतर मृतदेह जबलपूरपासून 45 किमी अंतरावर असलेल्या हिरण नदीच्या पुलावरून फेकून दिला. अमितचा जबाब नोंदवल्यानंतर पोलीस आरोपीसह घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहाचा शोध घेण्यास सुरुवात केली.

सना खान आणि अमित हे पती-पत्नी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून पैशांवरून वाद सुरू होता. सना खान अमितला भेटण्यासाठी नागपूरहून जबलपूरला गेली होती. बोलत असताना दोघांमध्ये वाद झाला आणि अमितने सनाच्या डोक्यात काठीने वार केले, त्यामुळे सनाचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणात आणखी एकाचा सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

वाचा >> पुण्यातील भाजपच्या नाराजी नाट्यावर नितीन गडकरींनी काढला मार्ग, काय घडलं?

सना खान 2 ऑगस्टला नागपूरहून जबलपूरला पोहोचली. यानंतर ती बेपत्ता झाली. हत्येचा संशय आल्याने सनाच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार केली. जबलपूरचे अतिरिक्त एसपी कमल मौर्य यांनी सांगितले की, तक्रार मिळाल्यानंतर जबलपूर आणि नागपूर पोलिसांनी मिळून सनाचा शोध सुरू केला. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे सनाचा पती अमित याचा शोध घेतला आणि पकडले.

आरोपीला गोराबाजारमधून अटक

आरोपी 37 वर्षीय अमित साहू उर्फ पप्पू याला पोलिसांनी शुक्रवारी जबलपूरच्या गोराबाजार परिसरातून अटक केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक कमल मौर्य यांनी सांगितले की, सध्या नदी आणि आसपासच्या परिसरात सना खानच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. आरोपीने त्याच्या एका साथीदाराचे नावही सांगितले, जो हत्येवेळी त्याच्यासोबत होता. त्याचाही पोलीस शोध घेत आहेत. आरोपी रस्त्याच्या कडेला ढाबा चालवतो.

सनाचे शेवटचे लोकेशन होते एक घर

नागपूर पोलिसांनी बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर 4 ऑगस्टला सना खानच्या शोधात जबलपूरला पोहोचले. चौकशी केली असता सनाचे शेवटचे लोकेशन जबलपूर येथील एका घरात असल्याचे आढळून आले. यानंतर जबलपूर आणि नागपूर पोलिसांनी संयुक्तपणे घराची झडती घेतली. 34 वर्षीय सना नागपूर शहरातील भाजप अल्पसंख्याक सेलची पदाधिकारी होती.

वाचा >> ह्रदयद्रावक! ‘खिशात 1000 रुपये आहेत, अंत्यसंस्कार करा’, चंद्रपूरमध्ये घरातच घेतला फास

सना खानने आईला फोन केला अन्…

पोलिसांनी सांगितले की, सना खानची आई मेहरुनिशा नागपुरात राहते. त्यांची मुलगी 1 ऑगस्ट रोजी जबलपूरला साहूला भेटण्यासाठी गेली होती, त्यानंतर ती बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांनी नोंदवली होती. त्यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलीस ठाण्यात शाहूविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. एफआयआरनुसार, सना खान बसने नागपूरहून निघाली होती. दुसऱ्या दिवशी जबलपूरला पोहोचल्यानंतर ती आईशी फोनवरून बोलली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली.

काय म्हणाले नागपूरचे डीसीपी?

सना नागपूर भाजपची सक्रिय कार्यकर्ते होती. अमित उर्फ पप्पू साहू याच्यासोबत जबलपूर येथील एका ढाब्यात तिची भागीदारी होती. या संदर्भात 1 ऑगस्ट रोजी सना अमितला भेटण्यासाठी जबलपूरला पोहोचली होती. तिथून ती बेपत्ता झाली. नागपूरचे डीसीपी झोन 2 राहुल मदने यांनी सांगितले की, सना बेपत्ता झाल्याची तक्रार नागपुरातील मानकापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. यानंतर नागपूर आणि जबलपूर पोलिसांनी मिळून सनाचा शोध सुरू केला.

    follow whatsapp