धर्म बदलण्यासाठी सासरच्यांकडून छळ, सांगलीत गर्भवती महिलेनं स्वत:ला संपवलं, कुटुंबीय म्हणाले...

मुंबई तक

12 Jun 2025 (अपडेटेड: 12 Jun 2025, 10:29 AM)

ऋतुजा सुकुमार राजगे (वय 27) असं मृत महिलेचं नाव असून, ती सात महिन्यांची गरोदर होती. या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

सांगलीमध्ये सुनेचा छळ, सासरच्यांचा धर्म बदलण्यासाठी आग्रह

point

हिंदू देवतांना नमस्कार करणं बंद करण्यासाठी दबाव

Sangli News : ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी सासरकडून दबाव येत असल्यानं विवाहीतेनं स्वत:ला संपवल्याची घटना घडलीये. सांगलीमध्ये सततच्या त्रासाला आणि दबावाला कंटाळून एका 27 वर्षीय उच्चशिक्षित गर्भवती आत्महत्या केली.  
खळबळजनक घटना समोर आली आहे. 

हे वाचलं का?

ऋतुजा सुकुमार राजगे (वय 27, एम.एस्सी) असं मृत महिलेचं नाव असून, ती सात महिन्यांची गरोदर होती. या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी ऋतुजाचा पती सुकुमार राजगे, सासरे सुरेश राजगे आणि सासू अलका राजगे यांना अटक केली आहे.

हे ही वाचा >> "प्राचार्याकडून जातीवाचक शिवीगाळ", विद्यार्थ्यानं वसतिगृहाच्या खोलीतच बेल्टने... नवी मुंबईत काय घडलं?

हिंदू देवतांना नमस्कार करणं बंद कर...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये ऋतुजा आणि सुकुमार यांचा विवाह झाला. विवाहापूर्वी राजगे कुटुंबाने स्वतःला हिंदू धनगर असल्याचं सांगितले होतं. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच हे कुटुंब ख्रिश्चन असल्याचे ऋतुजा आणि तिच्या माहेरच्या मंडळींच्या लक्षात आलं. याकडे दुर्लक्ष करून ऋतुजा संसार करत होती. पण, पती सुकुमार, सासरे सुरेश आणि सासू अलका यांनी ऋतुजावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तिला हिंदू देवतांना नमस्कार करणं बंद करण्यास आणि चर्चला येण्यास सांगितलं. तिला सांगलीतील राम मंदिर कॉर्नर येथील चर्च आणि मिरज खतिबनगर येथील पत्र्याच्या शेडमधील चर्चमध्ये नेऊन धर्मांतरासाठी जबरदस्ती केली गेली. चर्चमधील पास्टरांनीही तिच्या हिंदू धर्माच्या पूजेमुळे कुटुंबाला अडचणी येत असल्याचं सांगितलं.

ऋतुजाने आपल्या आई-वडिलांना या त्रासाबद्दल सांगितले होतं. त्यांनी अनेकदा सासरच्या मंडळींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण सासू-सासरे आणि पती यांनी तिला हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा तगादा लावला. या सततच्या मानसिक छळाला आणि दबावाला कंटाळून ऋतुजाने सात महिन्यांच्या गरोदरपणात गळफास लावून आत्महत्या केली.

हे ही वाचा >> गार्डनमध्ये फिरायला गेले आणि तिथेच अंत झाला.... कमानीचा भाग कोसळून 2 महिलांचा मृत्यू, घटना काय?

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ऋतुजाच्या माहेरच्या मंडळींनी कुपवाड एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी तक्रारीनुसार तपास सुरू केला असून, सुकुमार राजगे, सुरेश राजगे आणि अलका राजगे यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.