Crime News: सुल्तानपूरच्या पूर्वांचल एक्सप्रेसवेवर एका जोडप्याचा कारमधील रोमॅन्टिक व्हिडिओ अजूनही चर्चेत आहे. हालियापूर टोल प्लाझावरील अँटी ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमचा असिस्टिंट मॅनेजर आशुतोष सरकार याच्यावर हा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करण्यास सुरूवात केली असता, त्याने तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे. आरोपी आशुतोषच्या म्हणण्यानुसार, त्याला जाणूनबुजून या प्रकरणात अडकवलं जात आहे.
ADVERTISEMENT
या प्रकरणातील आरोपी आशुतोषने कॅमेऱ्यासमोर येऊन आपलं मत व्यक्त केलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, तो मूळचा कोलकाता येथील रहिवासी असून त्याने पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेतलं आहे. तसेच, तो मागील 2.5 वर्षांपासून टोल प्लाझावर ड्यूटी करत आहे. आरोपीला पीडित जोडप्यांचा खाजगी व्हिडिओ व्हायरल होण्याबद्दल विचारलं असता, त्याने सांगितले की हे व्हिडिओ त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या विभागातील सहकाऱ्यांनी व्हायरल केले होते. तसेच, आशुतोषने पीडितांकडून पैसे उकळल्याच्या त्याच्यावरील आरोपांनाही नकार दिला. काही स्थानिक लोक त्याला एक्सप्रेसवेवरून काढून टाकण्यासाठी त्याच्याविरुद्ध कट रचत असल्याचं त्याने स्पष्ट करत सांगितलं.
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले
8 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर व्हिडिओ आणि मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं तक्रार पत्र व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. पूर्वांचल एक्सप्रेस वेवरून प्रवास करणारं एक विवाहित जोडपं त्यांच्या कारमध्ये रोमान्स करत होते आणि टोल प्लाझावरील सीसीटीव्हीमध्ये हा खाजगी क्षण कैद झाला. अँटी ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमचा असिस्टिंट मॅनेजर आशुतोष सरकार याने पीडित जोडप्याने प्रायव्हेट व्हिडीओ शूट करून त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल्याचा जोडप्याचा आरोप आहे. आरोपांनुसार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आशुतोषने त्यांच्याकडून 32,000 रुपये उकळले. मात्र, तरी देखील तो व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, आशुतोषला कामावरून काढून टाकण्यात आलं.
हे ही वाचा: मुंबईची खबर: आता मुंबई ते पुणे प्रवासासाठी केवळ अडीच तास लागणार! देशातील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रिज अन्...
एक्सप्रेस वेवर बसवलेल्या कॅमेऱ्यांचा गैरवापर
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, पाच ते सहा पीडितांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सुल्तानपूर जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षक तसेच एक्सप्रेसवे अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रार पत्रात, पीडितांनी म्हटलं की, एटीएम मॅनेजर आशुतोष आशुतोष महिला आणि तरुणींवर लक्ष ठेवण्यासाठी एक्सप्रेस वेवर बसवलेल्या कॅमेऱ्यांचा वापर करत होते. तो महिला आणि तरुणींचे अश्लील किंवा आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड करून नंतर त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधायचा.
हे ही वाचा: मुंबई: सोलापूर–कल्याणदरम्यान सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये 5 कोटींचे सोने लंपास! प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह...
पोलिसांनी नोंदवला एफआयआर
पोलीस अधिकाऱ्यांनी मॅनेजर आशुतोषविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरमध्ये असं म्हटलं आहे की टोल प्लाझावर एटीएमच्या ड्युटीवर असताना, मॅनेजर आशुतोषने कॅमेऱ्याचा गैरवापर केला. कंत्राटी कंपनीने आशुतोष सरकारला कामावरून काढून टाकल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











