Shocking Murder Case : छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये झालेल्या पुजाऱ्याच्या हत्येमुळं खळबळ उडाली होती. पोलिसांनी हत्येच्या या प्रकरणाचा छडा लावला आहे. हे प्रकरण अनैतिक संबंधाशी जोडलं होतं, असं म्हटलं जात आहे. पुजारी जागेश्वर पाठकचे एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. महिलेच्या पतीने पुजाऱ्याला मारण्याचा प्लॅन केला होता आणि त्याची निर्घृण हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी पतीसह पाच लोकांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
अटक केलेल्या आरोपींमध्ये एका अल्पवयीनचाही समावेश आहे. पुजाऱ्याला पूजा करण्याच्या बहाण्याने बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर सस्पेंशन पाईपने हल्ला करून त्याला मारून टाकलं. ही धक्कादायक घटना 31 ऑगस्ट रोजी घडली. तखतपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुरीघाटमध्ये पाठ बाबा मंदिर परिसरात पुजारी जागेश्वर पाठकचा खून करण्यात आला. हत्येच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस, डॉग स्क्वॉड आणि एफएसएल टीम घटनास्थळी पोहोचली.
पुजाऱ्याचे महिलेसोबत होते अनैतिक संबंध..
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलीस सर्व बाजूंनी तपास करत होते. त्याचदरम्यान, पोलिसांना माहित झालं की, पुजाऱ्याचे महिलेसोबत अनैतिक संबंध होते. काही संशयितांना अटक करण्यात आली. तेव्हा या हत्याप्रकरणाचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी आरोपी सुरेश, हेमकुमार, धनराज, मुकेशसह एक अल्पवयीनला अटक केली आहे.
हे ही वाचा >> मोठी बातमी: 'मराठा आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच रोखा', हायकोर्टाचा थेट आदेश आणि 'यासाठी' अल्टिमेटमही!
पोलिसांनी आरोपींना 24 तासांमध्ये पकडलं
हत्येच्या घटनेमुळं या परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. एएसपी अर्चना झा, एसडीओपी कोटा, तखतपूर पोलिसांची टीम आणि ACCU टीमकडे तपास सोपवण्यात आला होता. पोलिसांनी या हत्याप्रकरणाचं गुढ उकळलं आणि सर्व आरोपींना अटक केली. तपासात समोर आलं की, आरोपी सुरेशची पत्नी आणि मृत पुजाऱ्याचे अनैतिक संबंध होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सुरेश धुरी आणि त्याच्या पत्नीचा सहा महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला होता. पुजाऱ्याच्या या संतापजनक कारनाम्याला आरोपी वैतागला होता. याचा बदला घेण्यासाठी आरोपीने शनिवारी रात्री प्लॅन केला आणि त्याच्या मित्रांसह पुजाऱ्याला मोटर सायकलची पूजा करण्याच्या बहाण्याने बाहेर बोलावलं. याचदरम्यान, त्याने सस्पेंशन पाईपने पूजाऱ्यावर हल्ला केला आणि सर्व आरोपी तिथून फरार झाले. तपासानंतर पोलिसांनी एका अल्पवयीनसह 5 आरोपींना अटक केली. याप्रकरणी पुढील तपास केला जात आहे.
हे ही वाचा >> भाचीच्या प्रेमात वेडापिसा झाला मामा! लग्न ठरल्यावर नराधमाने तरुणीच्या तोंडावर फेकलं ACID, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
ADVERTISEMENT
