दुधातून झोपेच्या गोळ्या द्यायचे अन् मुलांचे नग्न फोटो पाठवून सौदा... मुलं पळवणाऱ्या टोळीचा 'असा' झाला पर्दाफाश

मुलांचं अपहरण करून त्यांना विकणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. जीआरपी आणि आरपीएफच्या संयुक्त कारवाईत या टोळीतील तीन पुरुष आणि एक महिला या चार सदस्यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

मुलं पळवणाऱ्या टोळीचा 'असा' झाला पर्दाफाश

मुलं पळवणाऱ्या टोळीचा 'असा' झाला पर्दाफाश

मुंबई तक

• 11:05 AM • 13 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

दुधातून झोपेच्या गोळ्या द्यायचे अन् मुलांचे नग्न फोटो पाठवून सौदा...

point

मुलं पळवणाऱ्या टोळीचा 'असा' झाला पर्दाफाश

Crime News: उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातून मुलांचं अपहरण करून त्यांना विकणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून ही टोळी दीनदयाळ उपाध्याय जंक्शनवर सक्रिय होती. जीआरपी आणि आरपीएफच्या संयुक्त कारवाईत या टोळीतील तीन पुरुष आणि एक महिला या चार सदस्यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्यांच्यांकडून अपहरण करण्यात आलेला दोन वर्षांचा निष्पाप मुलगा सुरक्षितपणे ताब्यात घेतला असून त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही टोळी रेल्वे स्थानके आणि बस स्टँडसारख्या गर्दीच्या ठिकाणी फिरायची आणि संधी मिळताच मुलांचं अपहरण केलं जायचं. ही मुले बिहारमधील एका व्यक्तीला महागड्या किमतीत विकली जायची. 

हे वाचलं का?

बुधवारी रात्री, बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील एक महिला पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन कॉम्प्लेक्सच्या बाहेर तिच्या मुलांसह झोपली होती. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास, तिच्या दोन वर्षांच्या मुलाचं अपहरण झालं. संबंधित महिला झोपेतून जागी झाल्यानंतर तिला आपलं मुल तिच्याजवळ दिसलं नाही आणि मुल हरवल्याचं कळताच तिने तातडीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. 

दुधाची बाटली आणि झोपेच्या गोळ्या जप्त... 

तक्रार मिळताच, जीआरपी आणि आरपीएफ पथके सक्रिय झाली. त्यांनी स्टेशन परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात शोध सुरू केला. संशयास्पद हालचालींच्या आधारे, पोलिसांनी चार जणांना अटक केली आणि अपहरण केलेलं मूल जप्त करण्यात आलं. अटक केलेल्या आरोपींची झडती घेतल्यानंतर, पोलिसांना मुलांचे नवे कपडे, दुधाची बाटली आणि झोपेच्या गोळ्या सुद्धा मिळाल्या. चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितलं की, ते मुलांना दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन त्यांना बेशुद्ध करायचे, जेणेकरून मुलाचं अपहरण करताना त्याचा कोणताही आवाज येणार नाही. 

हे ही वाचा: दोन मुलांचा बाप असूनही दया-माया दाखवली नाही, विकृताने चिमुकलीला दातांनी इतकं छळलं की कोमात गेली

पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत स्पष्ट केलं की ही टोळी संघटित पद्धतीने काम करत होती. मुलाचे अपहरण केल्यानंतर, त्यांचे नग्न फोटो पुढच्या टीम किंवा खरेदीदाराला पाठवले जायचे. तिथून त्यांचा होकार मिळाल्यानंतरच, मुलाला त्यांच्याकडे विकलं जायचं. याबाबत त्यांनी सांगितलं की ही टोळी फक्त मेल चाइल्ड्स म्हणजे मुलांना लक्ष्य करायची, याचाच अर्थ मुलींचं अपहरण केलं जात नव्हतं. नवजात बाळांना जास्त किंमत मिळायची, म्हणजेच मूल जितकं लहान असेल तितकी किंमत जास्त. आता पोलीस या टोळीच्या मास्टरमाइंडच्या शोधात असल्याचं सांगितलं जात आहे. 

पोलिसांनी सुरक्षितपणे ताब्यात घेतलेल्या मुलाला त्याच्या आईकडे सोपवलं. सध्या, टोळीतील चारही आरोपींना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. या संघटित गुन्ह्याच्या मुळाशी जाण्यासाठी जीआरपी आणि आरपीएफ पथके आता टोळीच्या नेटवर्कचा आणि त्याच्याशी संबंधित इतर व्यक्तींचा तपास करत आहेत.

    follow whatsapp