सॅनिटरी पॅडच्या आड दारुची तस्करी, लाखो रुपयांच्या बिअरचा साठा जप्त

मुंबई तक

22 Apr 2023 (अपडेटेड: 22 Apr 2023, 06:07 AM)

सॅनेटरी पॅडच्या आडून बनावट बिअर आणि व्हीस्कीची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करुन तब्बल 18 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

smuggling of liquor under the cover of sanitary pads seizure of beer stock worth lakhs of rupees

smuggling of liquor under the cover of sanitary pads seizure of beer stock worth lakhs of rupees

follow google news

धुळे: सॅनेटरी पॅडच्या आडून बनावट बिअर आणि व्हीस्कीची तस्करी करणाऱ्यांविरोधात धुळ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. अवधान फाट्यावर एलसीबी पीआय हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून अवैध दारु वाहतूक करणारा आयशर ट्रक पकडला. यावेळी चालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही दारू गोवा येथून सुरत येथे नेली जात होती. जप्त केलेल्या दारुसाठ्याची आयशरसह किंमत 18 लाख 44 हजार 600 रुपये इतकी आहे. याप्रकरणी मोहाडी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (smuggling of liquor under the cover of sanitary pads seizure of beer stock worth lakhs of rupees)

हे वाचलं का?

बनावट दारुची तस्करी करणारे भामटे पोलिसांच्या जाळ्यात

UP-80-FT-9398 या क्रमांकाच्या आयशर ट्रकमधून बेकायदेशीररित्या विदेशी दारु ही आर्वी-धुळेमार्गे सुरतकडे नेली जात असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना आज मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवधान फाटा येथे आर्वीकडून धुळ्याकडे येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली. तेव्हा संशयित ट्रक धुळ्याकडे जात असल्याचे दिसल्याने अडथळा करुन थांबविण्यात आला.

हे ही वाचा>> सासूचं जावयावर जडलं प्रेम, नात्यात अडसर ठरत असल्याने पतीचा काढला काटा

यावेळी ट्रक चालकाची चौकशी करुन त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी अर्जुन रामजीत बिंद ( वय 24 रा. शेखाही पो. अधनपुर ता. शाहगंज जि. जौनपुर, उत्तरप्रदेश) व सोमनाथ नाना कोळी (वय 26 रा. खामखेडा ता. शिरपूर) अशी सांगितली. दोघांना ट्रकमधील मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी ट्रकमध्ये सॅनिटरी पॅड असल्याचे सांगून त्याबाबत मालाची बनावट बिलंही दाखविली. परंतु मिळालेली गुप्त माहिती आणि ट्रक चालकांचे हावभाव यामुळे एलसीबीच्या त्यांच्यावरील संशय बळावला.

तब्बल 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

ट्रकसह दोघांना ताब्यात घेत पोलीस अधिक्षक कार्यालयात आणून ट्रकची तपासणी करण्यात आली. ट्रकच्या पाठीमागील बाजूला सॅनीटरी पॅडच्या गोण्या भरल्याचे व समोरील बाजुस दारू व बिअरचे बॉक्स मिळून आले. 7 लाख 81 हजार 800 रुपये किंमतीची देशी-विदेशी विविध कंपन्यांची व्हिक्सीचे एकूण 205 खोके त्यात एकूण 6 हजार 804 दारूच्या बाटल्या, 40 हजार 800 रुपयांची टुब्रो प्रिमियम बीअर स्ट्रॉंगचे 20 बॉक्स त्यात 840 बाटल्या, 10 लाखांचा आयशर ट्रक, 12 हजारांचे सॅनिटरी पॅडच्या पांढऱ्या रंगाच्या 120 गोण्या व 10 हजारांचे दोन मोबाइल असा एकूण 18 लाख 44 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हे ही वाचा>> 2 दशकाच्या गुंडगिरीचा एका मिनिटात भयानक अंत.. अतीक-अशरफच्या हत्येपर्यंतची संपूर्ण कहाणी

याप्रकरणी दोघा आरोपींविरूध्द मोहाडीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांनी हा माल कोठूनआणला व कोठे पाठविणार होते या साखळीमध्ये आणखी कोण आरोपी आहेत का? याबाबत दोघांकडे चौकशी केली जात आहे. याबाबत अधिक माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

    follow whatsapp