एकाच स्कार्फने दोघांनी जीवन संपवलं! ट्रकचालक रोहित आणि डी फार्म'च्या विद्यार्थीनीमध्ये काय घडलं?

सुट्टीनिमित्त अश्विनी सोलापुरात आली होती. अश्विनी ही सोलापुरात उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कर्नाटकातील बागलकोट येथील डी फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती.

Mumbai Tak

मुंबई तक

20 Jun 2025 (अपडेटेड: 20 Jun 2025, 01:06 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोलापूरमध्ये मुलगा आणि मुलीने सोबत जीवन संपवलं

point

एकाच स्कार्फने दोघांनीही घेतला गळफास

point

दोघांमध्ये असं काय घडलं?

Solapur Suicide News : सोलापूर शहरातील कर्णिक नगर परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत गुरुवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर तरुण आणि तरुणीने एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आणि एमआयडीसी पोलिसांनी तपास सुरू केला.

हे वाचलं का?

दोघेही भाऊ बहीण असल्याचं चिठ्ठीत म्हटलं...

हे ही वाचा >> मार्केटमध्ये नवा स्कॅम... गूगल पेचा अधिकारी सांगून दुकानात गेला, मशिन अपडेट करायचं म्हणत डाव टाकला, घटना काय?

प्राथमिक तपासात घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून, त्यात दोघांनी एकमेकांना भाऊ-बहीण म्हणून संबोधल्याचा उल्लेख आहे. मात्र, त्यांच्यातील नेमके नाते काय होते, याबाबत स्पष्टता नसून पोलिसांचा तपास सुरू आहे. मृत तरुणाचे नाव रोहित भिमु ठणकेदार (वय 21, रा. मड्डी वस्ती, सोलापूर) तर मृत तरुणीचे नाव अश्विनी विरेश केसापुरे (वय 23, रा. शाहीर वस्ती, सोलापूर) असे आहे.

ट्रक चालक रोहित... 

रोहित हा अविवाहित असून, ट्रक चालक म्हणून काम करत होता. तो अश्विनीच्या संपर्कात होता आणि काही वेळा तिच्या घरी तिला भेटण्यासाठी आला होता. नातेवाइकांनी विचारणा केली असता, दोघांनी भाऊ-बहीण नात्याचा दावा केला होता, अशी माहिती अश्विनीच्या नातेवाइकांनी दिली.

डी फार्मसीची विद्यार्थीनी अश्विनी

सुट्टीनिमित्त अश्विनी सोलापुरात आली होती. अश्विनी ही सोलापुरात उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कर्नाटकातील बागलकोट येथील डी फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. गुरुवारी सकाळी ती बागलकोटला परत जाण्यासाठी घरातून निघाली होती. मात्र, सायंकाळी एमआयडीसी पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना आत्महत्येची माहिती दिली. शासकीय रुग्णालयात मृतदेह पाहून अश्विनीच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला.

हे हीव वाचा >> लग्न करायचं म्हणून गोव्याला गेले, वादानंतर प्रेयसिचा खून करुन जंगलात फेकलं, एका तिकीटामुळे बिंग कसं फुटलं?

दोघांनी एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी याप्रकरणी सखोल तपास करत आहेत. शवविच्छेदनानंतर दोघांचे मृतदेह नातेवाइकांना सोपवले जाणार आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दोन्ही कुटुंबीय शासकीय रुग्णालयात उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    follow whatsapp