Suchana Seth : पोटच्या पोराला सूचनानं कसं संपवलं? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून झाला खुलासा

प्रशांत गोमाणे

10 Jan 2024 (अपडेटेड: 10 Jan 2024, 04:04 AM)

प्रसिद्धीच्या आणि यशाच्या उच्चशिखरावर असलेल्या सूचना सेठ यांनी तीन दिवसांची गोवा ट्रिप प्लान केली होती. या ट्रिपवर त्या आपल्या 4 वर्षीय मुलाला घेऊन जाणार होत्या. या ट्रिपमागे त्यांच्या डोक्यात एक वेगळचं कटकारस्थान शिजत होते.

suchna seth killed his son use pilow and towel for murder goa murder story marathi crime news

suchna seth killed his son use pilow and towel for murder goa murder story marathi crime news

follow google news

Goa Murder : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) जगात प्रसिद्धीच्या उच्चशिखरावर पोहोचलेल्या 39 वर्षीय सुचना सेठ चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. या मागचं कारण ठरलाय तो म्हणजे त्याचा 4 वर्षीय मुलगा. या चिमुकल्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही हत्या सूचना सेठ यांनीच केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गोव्यात ही घटना घडली आहे. त्यामुळे गोवा हादरलं आहे.आता या प्रकरणात सुचना सेठ (suchna seth) यांच्यावर आपल्याच 4 वर्षीय मुलाची हत्या करण्याची वेळ का आली? या हत्येमागचं कारण काय आहे? हे जाणून घेऊयात. (suchna seth killed his son use pilow and towel for murder goa murder story marathi crime news)

हे वाचलं का?

मुलासह गोवा ट्रिपवर…

सूचना सेठ हे नाव सोशल मीडियाला काही नवं नाही. कारण आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या जगात त्यांनी यशस्वी भरारी घेतली आहे. सूचना सेठ एक यशस्वी सीईओ, एक यशस्वी टेक्नो आणि यशस्वी उद्योजक यासोबत बंगळुरूमधील स्टार्टअपचे संस्थापक आणि सीईओ देखील आहेत. प्रसिद्धीच्या आणि यशाच्या उच्चशिखरावर असलेल्या सूचना सेठ यांनी तीन दिवसांची गोवा ट्रिप प्लान केली होती. या ट्रिपवर त्या आपल्या 4 वर्षीय मुलाला घेऊन जाणार होत्या. या ट्रिपमागे त्यांच्या डोक्यात एक वेगळचं कटकारस्थान शिजत होते. हे कारस्थान ऐकूण पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

हे ही वाचा : MNS : ‘राज ठाकरे दलाल, अमित खंडणीखोर’, मनसे नेत्याच्या आरोपानंतर तुफान राडा

सूचना सेठ या आपल्या मुलासह बंगळुरुवरून फ्लाईटने गोव्याला आल्या होत्या. या ट्रिपमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्यानंतर एका हॉटेलमध्ये त्यांनी मुलाची हत्या केली. यानंतर त्यांनी सुसाईड करण्याचाही प्रयत्न केला होता. पण नंतर त्यांनी मुलाचा मृतदेह बॅगमध्ये भरून हॉटेलमधून फरार होण्याची तयारी केली. मात्र हॉटेल स्टाफच्या सतर्कतेमुळे ही संपूर्ण घटना उघडकीस आली. त्याचं झाल असं की सूचना सेठ हॉटेलमध्ये चेक ईन करताना आपल्या 4 वर्षीय मुलासोबत आल्या होत्या. मात्र चेक आऊट करताना त्या एकट्याच बाहेर पडल्या. यावर स्टाफने मुलाची विचारणा केली असता त्यांनी मुलाला पुढे पाठवल्याची माहिती दिली. त्यानंतर सूचना सेठ कॅबमध्ये बसून निघून गेल्या होत्या.

हॉटेल स्टाफला सूचना सेठ यांच्यावर संशय आल्याने त्यांनी रूमची तपासणी केली असता त्यांना रक्ताचे डाग आढळले होते. त्यामुळे हॉटेल स्टाफला संशय आणखीणच बळावला. त्यानंतर हॉटेल स्टाफने पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि सूचना यांच्या कॅब ड्रायव्हरला कॅब थेट पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले. यावेळी सूचना सेठ यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचे सुटकेस तपासले असता मुलाची हत्या झाल्याचा उलगडा झाला. यानंतर पोलिासांनी मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला होता.

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय?

दरम्यान आता पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे.या रिपोर्टमध्ये हत्येचे कारण सांगितले आहे. या रिपोर्टनुसार, मुलाच्या हत्येसाठी नक्कीच कुठल्यातरी शस्त्राचा वापर झाल्याचे सांगण्यात आले आहे. हे शस्त्र उशी किंवा टॉवेल असू शकते, ज्याचा उपयोग मुलाचा गळा दाबण्यासाठी केला गेला असावा, असे हिरयुर येथील शासकीय रुग्णालयाचे प्रभारी यांनी डॉक्टर कुमार नाईक यांनी सांगितले आहे.

न्यायालयाच्या निर्णयाने होत्या नाराज

सूचना सेठचं लग्न 2010 मध्ये झालं होते, ती मुळची पश्मिम बंगालची, मात्र तिचा नवरा हा केरळचा होता. लग्नानंतर त्या दोघांना एक मुलगा झाला. मात्र 2020 मध्ये त्या पती-पत्नीमध्ये वादाला सुरुवात झाली. आणि प्रकरण कोर्टात पोहोचलं. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला, मात्र त्यावेळी न्यायालयाने वडील त्याच्या मुलाला दर रविवारी भेटू शकतात असा निर्णय दिला होता. या कोर्टाच्या या निर्णयामुळे ती प्रचंड नाराज आणि तणावात राहू लागली. तिला अजिबात असं वाटत नव्हतं की, तिच्या नवऱ्याने तिच्या त्या मुलाला भेटावं. यातूनच तिने तिच्या मुलाची हत्या केली आहे.

हे ही वाचा :Mla Disqualification : शिंदे-ठाकरेंची धडधड वाढली, व्हीपच करणार करेक्ट कार्यक्रम!

आता या प्रकरणी पोलिसांनी सूचना सेठ यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहे.

    follow whatsapp