Crime News: बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील अगरेरमध्ये एका महिलेने आपल्या पती, दीर आणि सासऱ्यांसोबत निर्घृण कृत्य केल्याची घटना घडली आहे. आरोपी महिलेने तिच्या कुटुंबियांच्या जेवणात विष मिसळून त्यांची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. तसेच, ते विषारी जेवण खाऊन आरोपीच्या दीराची तब्येत खालावली असल्याची माहिती आहे. प्रकरणातील आरोपी महिला धनौतू देवीला पोलिसांनी अटक केली असल्याचं सांगितलं जात आहे. बुधवारी (17 सप्टेंबर) रात्री, महिलेने जेवणात विष मिसळून पीडितांची हत्या केली असून पैशांच्या वादातून आरोपीने असं कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या, आरोपी महिलेची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
जेवल्यानंतर तिघांची तब्येत बिघडली...
पीडित कुटुंबीय बक्सर जिल्ह्यातील धनसोई पोलीस स्टेशन परिसरातील रामपूर गावाचे रहिवासी असून 48 वर्षीय बेचन चौधरी आपली मुलं विशाल कुमार (19 वर्षे) आणि विकास कुमार (14 वर्षे) यांच्यासोबत गवंडीचं काम करत होते. बुधवारी रात्री जेवल्यानंतर तिघांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यावेळी बेचन चौधरी आणि त्यांचा मोठा मुलगा विशालचा मृत्यू झाला. तसेच, विकासवर सासाराम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा: पतीच्या मोबाईलमध्ये पाहिले 'ते' चॅट्स, पत्नी प्रचंड संतापली अन् जाब विचारताच घडली भयानक घटना...
पोलिसांचा तपास
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. संबंधित कुटुंबियांच्या सुनेने जेवणात विष मिसळून आपल्या पती आणि सासऱ्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. आता पोलीस या प्रकरणासंदर्भात तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडली, नंतर अपहरण करून सामूहिक बलात्कार... पीडितेला 'त्या' ठिकाणी फेकलं अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पती-पत्नीमध्ये पैशांच्या कारणावरून सतत वाद होत होते. पत्नी नेहमी आपल्या पतीवर पैशांसाठी दबाव आणत असल्याचं सांगितलं जात आहे. याच कारणामुळे धनौती देवीने जेवणात विष मिसळून ते आपल्या पती, दीर आणि सासऱ्यांना खायला दिलं. कुटुंबियांनी केलेल्या आरोपांच्या आधारे, धनौती देवीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरू आहे. चौकशी आणि प्राथमिक तपासादरम्यान, विष देऊन हत्या केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. सध्या, प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच दोषीवर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
