तिन्ही मित्रांनी एकत्र नदीत उडी मारली अन् आयष्य संपवलं! इंस्टाग्राम रील की प्रेमसंबंध? नेमकं प्रकरण काय?

तिन्ही तरुणांनी आधी इंस्टाग्रामवर एक रील शेअर केली आणि नंतर एकमेकांचा हात हातात घेऊन तलावात उडी मारली. संबंधित तरुणांचे एकत्र मृतदेह सापडल्यानंतर स्थानिकांना मोठा धक्का बसला. नेमकं प्रकरण काय?

इंस्टाग्राम रील की प्रेमसंबंध? नेमकं काय घडलं?

इंस्टाग्राम रील की प्रेमसंबंध? नेमकं काय घडलं?

मुंबई तक

• 02:39 PM • 01 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

तिन्ही मित्रांनी एकत्र नदीत उडी मारून आयष्य संपवलं!

point

इंस्टाग्राम रील की प्रेमसंबंध? नेमकं प्रकरण काय?

Crime News: गुजरातच्या अहमदाबादमध्ये तीन मित्रांनी एकत्र मिळून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. तिन्ही तरुणांनी कलोल तालुक्यातील नारदीपूर गावात एका खोल तलावात उडी मारून स्वत:चं आयुष्य संपवलं. त्यांनी आधी इंस्टाग्रामवर एक रील शेअर केली आणि नंतर एकमेकांचा हात हातात घेऊन तलावात उडी मारली. संबंधित तरुणांचे एकत्र मृतदेह सापडल्यानंतर स्थानिकांना मोठा धक्का बसला. नेमकं प्रकरण काय?

हे वाचलं का?

तिन्ही तरुणांपैकी एका मुलाच्या चुलत भावाने इन्स्टाग्रामवर रील पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानेच इतर कुटुंबियांना याबद्दल माहिती दिली. त्यावेळी त्यांनी तातडीने संबंधित तलावाकडे धाव घेतली आणि तिथे मृत तरुणांच्या वस्तू त्यांना सापडल्या. इंस्टाग्राम रील्स बनवण्याच्या नादामुळे तिन्ही तरुणांना आपला जीव गमवावा लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. हे तिघे मित्र आत्महत्येचं नाटक करत व्हिडिओ शूट करत होते. त्यानंतर त्यांनी नारदीपूर तलावात उडी मारली आणि त्यावेळी त्यांच्या मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावर लोक या प्रकरणाबद्दल बऱ्याच प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही जणांच्या मते, हे नाटक नसून कदाचित तिघेही नैराश्यात होते आणि म्हणूनच त्यांनी आत्महत्या केली. मृत तरुणांनी त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याबद्दल सुद्धा सांगितलं. तिघांपैकी एकाने तर आपल्या प्रेयसीसाठी आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. काहींनी म्हटलं की आजकाल रील्स बनवणे फॅशनेबल झालं आहे. जरी त्यासाठी त्यांना आपला जीव गमवावा लागला तरी काही लोक रील्स बनवण्यासाठी कोणत्याही थराला जातात. या तरुणांसोबत सुद्धा नेमकं हेच घडलं.

मृताच्या भावाने दिली माहिती  

धैर्य श्रीमाली (21), कौशिक माहेरिया (23) आणि अशोक वाघेला (39) अशी प्रकरणातील मृत तरुणांची ओळख असल्याचं समोर आलं आहे. तिघे सुद्धा गांधीनगरच्या कालोल तालुक्यातील नारदीपूर गावाचे रहिवासी होते. धैर्यचा मोठा भाऊ यश श्रीमाली याने पोलिसांना सांगितलं की ते शनिवारी रात्री गांधीनगरमध्ये एका गरबा कार्यक्रमात सहभागी झाले होते. रात्री 10:30 च्या सुमारास, एका शेजाऱ्याने त्यांना फोन करून कळवलं की धैर्य आणि त्याच्या दोन मित्रांनी इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे, या व्हिडीओमध्ये ते आपलं जीवन जीवन संपवण्याबद्दल बोलत आहेत. यशने लगेच तो व्हिडिओ पाहिला आणि तो तातडीने नारदीपूर तलावाकडे गेला. तिथे त्याला दोन मोबाईल फोन, चप्पल, एक पाकीट, चाव्या आणि कौशिकची मोटारसायकल आढळली.

हे ही वाचा: ही भिवंडी आहे, मराठीची गरज काय? अबू आझमी नेमकं काय म्हणाले?

नदीत सापडले मित्रांचे मृतदेह   

या घटनेनंतर गावकऱ्यांनी ताबडतोब स्थानिक जलतरणपटूंना बोलावलं आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर तिन्ही मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले. पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तिन्ही तरुणांनी एकमेकांचे हात हातात घेतले होते. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कालोल सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

हे ही वाचा: 'शपथ घेतो की महाराष्ट्र लुटारू आणि दरोडेखोरांच्या हाती जावू देणार नाही ...' ठाकरेंच्या शिवसेनेचा काटा आणणारा दसरा मेळावा टीझर

पोलिसांचा सखोल तपास  

मृत तरुण इंस्टाग्रामवरील रीलसाठी आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ शूट करत असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं. सध्या तो फक्त एक स्टंट होता की त्याने खरोखरच आत्महत्येचा प्रयत्न केला, याचा तपास सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणात पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून मृताच्या कुटुंबीयांचे आणि मित्रांचे जबाब नोंदवले जात असल्याचं सांगण्यात येत आहे.

    follow whatsapp