Crime News: दिल्ली पोलिसांच्या सराय रोहिल्ला पोलिस स्टेशनच्या पथकाने उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर शस्त्रांच्या एका मोठ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे आणि या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली आहे. येथे एका शेतात बांधलेल्या दोन खोल्यांमध्ये इथे अलीगडमध्ये, एका शेताच्या मध्यभागी बांधलेल्या दोन खोल्यांमध्ये अवैध शस्त्रांचा व्यापार सुरू होता, गेल्या काही दिवसांमध्ये येथे काही लोकांचं सतत येणं-जाणं असायचं. पोलिसांच्या छापेमारीत या बेकायदेशीर व्यापाराचा पर्दाफाश करण्यात आला.
ADVERTISEMENT
महिलेनं केली तक्रार...
हे प्रकरण 11 आणि 12 ऑगस्ट 2025 च्या मध्यरात्री सराई रोहिल्ला येथील चुना भट्टी परिसरात घडलेल्या एका प्रकरणाशी संबंधित आहे. त्या रात्री एका महिलेने अशी तक्रार केली होती की एका मुलाने तिचा भाऊ शुभम उर्फ लाला याच्यावर गोळी झाडली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका शेजाऱ्याने आरोपी अल्पवयीन मुलाकडून पिस्तूल हिसकावून घेतली, परंतु तो आरोपी तिथून पळून गेला.
भांडणात गोळी झाडली
12 ऑगस्ट रोजी पोलिसांनी 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, गणेश मूर्ती खरेदी करण्यावरून झालेल्या वादात त्याने शुभमवर गोळी झाडली होती. त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्तूल आणि एक काडतूसही जप्त करण्यात आले. चौकशीत, अल्पवयीन मुलाने हे शस्त्र अलीगढ येथील रहिवासी विजय कुमार उर्फ बंटी यांच्याकडून खरेदी केल्याचं सांगितलं.
हे ही वाचा: मावशीसोबतच पतीचे अनैतिक संबंध! पत्नीने केला विरोध अन्... लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यांतच घडलं असं काही की...
बेकायदेशीर शस्त्रास्त्र कारखाना
यानंतर, पोलिस पथकाने इन्स्पेक्टर विकास राणा आणि एसीपी अनिल शर्मा यांच्या देखरेखीखाली छापा टाकला. आरोपी बंटीला 27 ऑगस्ट रोजी अलीगढच्या गंगा गढी गावातून पकडण्यात आलं. मथुरेच्या बिजेंद्र सिंगकडून शस्त्रे खरेदी केली असल्याचं बंटीने कबूल केलं. त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी बिजेंद्रलाही अटक करण्यात आली होती. त्याच्या मोबाईल फोनमध्ये बेकायदेशीर शस्त्रे बनवतानाचे 70 हून अधिक व्हिडिओ सापडले. चौकशीदरम्यान बिजेंद्रने बेकायदेशीर शस्त्रास्त्र कारखाना चालवणाऱ्या अलीगड येथील हनवीर उर्फ हन्नूचे नाव उघडकीस आणले.
1 सप्टेंबर रोजी पोलीस पथकाने अलीगढमधील जट्टारी पिशावा रोडवरील एका शेतात बांधलेल्या दोन खोल्यांमध्ये छापा टाकला. तिथे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि त्यांचा कच्चा माल जप्त करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरून हनवीरला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने कबूल केलं की तो 15-20 वर्षांपासून बेकायदेशीर शस्त्रे बनवण्याच्या व्यवसायात गुंतलेला आहे आणि आतापर्यंत त्याने 1200 हून अधिक शस्त्रे विकली आहेत.
हे ही वाचा: Personal Finance: किती वेळात पैसे दुप्पट, तिप्पट किंवा चौपट होतील? 3 फॉर्म्युले तुमचं नशीबच टाकेल उजळून
पोलिसांनी जप्त केली ‘ही’ शस्त्रे
जप्त केलेल्या वस्तूंमध्ये 6 देशी बनावटीचे पिस्तूल, 12 अर्धवट बनवलेले पिस्तूल, 6 जिवंत काडतुसे, 5 रिकामे काडतुसे, 13 बॅरल, 44 लहान बॅरल, 12 लहान बॅरल पाईप, 3 मोठ्या बॅरल पाईप आणि शस्त्रे बनवण्याच्या मशीनचा समावेश आहे. आरोपींच्या गुन्हेगारी रेकॉर्डची चौकशी सुरू असून या नेटवर्कशी संबंधित इतर लोकांचाही शोध घेतला जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
