Personal Finance: किती वेळात पैसे दुप्पट, तिप्पट किंवा चौपट होतील? 3 फॉर्म्युले तुमचं नशीबच टाकेल उजळून
Rule of 72: तुमचे पैसे कधी दुप्पट, तिप्पट किंवा चौपट होतील? 72, 114 आणि 144 चा फॉर्म्युला जाणून घ्या, पर्सनल फायनान्स या मालिकेतील सोप्या फॉर्म्युलासह आणि उदाहरणांसह गुंतवणुकीच्या स्मार्ट युक्त्या समजून घ्या.
ADVERTISEMENT

Personal Finance Tips for Money Double: 'माझे पैसे कधी दुप्पट होतील? मी माझे पैसे कधी तिप्पट किंवा चौपट करू शकेन?' हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात घोळत असतो. लोकांना वाटते की, त्यांचे कष्टाचे पैसे दिवस-रात्र दुप्पट व्हावेत. बाजारात अनेकदा अशा योजना सांगितल्या जातात ज्यामध्ये असा दावा केला जातो की गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट होतील आणि तेही अगदी कमी वेळात. अशा योजनांच्या नावाखाली अनेकदा गुंतवणूकदार पैसे गमावून बसतात. आता प्रश्न असा आहे की, असा कोणता फॉर्म्युला आहे की, ज्याद्वारे पैसे दुप्पट करता येतील.
पैसे दुप्पट करणे किंवा चौपट करणे तुमच्या गुंतवणुकीवर आणि त्याच्या वेळेवर अवलंबून असते. पण पैसे दुप्पट, तिप्पट किंवा चौपट होण्यासाठी किती वेळ लागेल हे काही खास आर्थिक सूत्राद्वारे कळू शकते. पर्सनल फायनान्सच्या या मालिकेत, आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर सांगणार आहोत.
72 चा फॉर्म्युला काय आहे?
72 चा फॉर्म्युला हे एक साधं गणितीय सूत्र आहे, जे सांगतं की, तुमची गुंतवणूक रक्कम निश्चित व्याजदराने किती वर्षांत दुप्पट होईल. चला हे तर हे सूत्र समजून घेऊया.
फॉर्म्युला
72 ÷ व्याजदर (%) = पैसे दुप्पट होण्यासाठी लागणारा वेळ (वर्षांमध्ये)










