चिमुरड्याला चार तास कोंडलं डीप फ्रीजरमध्ये, चोरीच्या संशयातून दुकानदाराचे कृत्य; यातनेने विव्हळणाऱ्या चिमुरड्याचं काय झालं?

माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. दुकानात चोरी केल्याच्या संशयावरुन एका दुकानदाराने चिमुरड्याला डीप फ्रिजरमध्ये कोंडून ठेवले. अनेक तास तो चिमुरडा रडत, कुडकुडत त्या फ्रीजरमध्ये बसला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

01 Apr 2026 (अपडेटेड: 01 Apr 2026, 12:58 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

चिमुरड्याला चार तास कोंडलं डीप फ्रीजरमध्ये

point

चोरीच्या संशयातून दुकानदाराचे कृत्य

point

पुढे काय घडलं?

Crime News : माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका ७ वर्षांच्या निष्पाप चिमुरड्यावर चोरीचा संशय घेऊन एका निर्दयी दुकानदाराने त्याला 'डीप फ्रीझर'मध्ये कोंडून ठेवले. गोठवून टाकणाऱ्या त्या थंडीत आणि मृत्यूच्या छायेत तो चिमुरडा सलग 4 ते 5 तास रडत-ओरडत राहिला, पण त्या नराधमाला त्याची साधी दयाही आली नाही. ही घटना 30 मार्च रोजी उत्तर प्रदेशातील हापुड परिसरात घडली. या घटनेचे पडसाद आता संपूर्ण परिसरात उमटत आहेत.

हे वाचलं का?

दुकानात चोरीचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, आझाद नावाच्या या दुकानदाराने इम्रान यांच्या लहान मुलावर सामान चोरीचा आरोप केला होता. शिक्षा देण्यासाठी त्याने त्या निष्पापाची मान चाकूने कापण्याची धमकी दिली आणि त्यानंतर त्याला आपल्या दुकानातील बर्फाळ फ्रीझरमध्ये ढकलून वरून दरवाजा बंद केला. बाहेर कडाक्याचे ऊन असताना, आत तो चिमुरडा जीव वाचवण्यासाठी त्या लोखंडी पेटीत रडत आणि कुडकुडत होता. तासनतास चाललेल्या या छळामुळे त्या निरागस जिवाचा थरकाप उडाला होता.

हे ही वाचा : अकोला : 'तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव..' महिला आरोपीकडे पोलिसाची आक्षेपार्ह मागणी; व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

या अमानवीय कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या अंगावर काटा आला. व्हिडिओमध्ये त्या मुलाची विव्हळण्याची अवस्था पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून आरोपी आझादला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित वडिलांनी न्यायाची आर्त हाक मारली असून, 'माझ्या पोटच्या गोळ्याला ज्या यातना भोगाव्या लागल्या, तशा कोणाच्याही नशिबी येऊ नयेत,' अशी भावना व्यक्त केली आहे.

हे ही वाचा : Govt Bank Jobs : पदवीधर तरुणांना सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, 'ही' आहे अर्जाची शेवटची तारीख

आरोपीवर कठोर कारवाई होणार

थंडीमुळे निळा पडलेला आणि मानसिक धक्क्यात असलेला हा चिमुरडा आता मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला असला, तरी त्याच्या मनावर झालेले घाव कधी भरून येतील, हाच मोठा प्रश्न आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की, आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे. कायद्याला हातात घेऊन एका लहान मुलाचा क्रूर छळ करणाऱ्या अशा नराधमाला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा विश्वास प्रशासनाने दिला आहे.