उत्तर प्रदेशातील दोन सख्ख्या भावांची महाराष्ट्रात हत्या, गळ्यावर 25 वार करत संपवले; मालेगावात करायचे पेंटिंगचे काम

उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रातील मालेगावात उदरनिर्वाहासाठी आलेल्या दोन भावांची निर्घृण हत्या झाली आहे. रात्री अडीचच्या सुमारास हल्लेखोरांनी झोपलेल्या दोन्ही भावांवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

uttar pradesh gorakhpur

uttar pradesh gorakhpur

मुंबई तक

13 Apr 2026 (अपडेटेड: 13 Apr 2026, 09:24 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

उत्तर प्रदेशातील दोन सख्ख्या भावांची महाराष्ट्रात हत्या

point

गळ्यावर 25 वार करत संपवले

point

मालेगावात करायचे पेंटिंगचे काम

Crime News : उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील निखिल साहनी आणि अनिश साहनी या दोन तरुणांची महाराष्ट्रातील मालेगाव येथे निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हे दोन्ही भाऊ मालेगावमध्ये पेंट-पॉलिशचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी (7 एप्रिल) रात्री अडीचच्या सुमारास हल्लेखोरांनी झोपलेल्या दोन्ही भावांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही भावांचा मृत्यू झाला असून हल्लेखोर अद्याप फरार आहेत.

हे वाचलं का?

'काका मला वाचवा..'

यावेळी मृत भावांचे काका दुर्गेश साहनी शेजारच्या खोलीत उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, अनिशचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांना जाग आली. अनिश ओरडत होता, "काका मला वाचवा." जेव्हा दुर्गेश यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना मदत करता येऊ नये म्हणून त्यांचा दरवाजा बाहेरून बंद करण्यात आला होता. दुर्गेश यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी बकरा कापण्याच्या चाकूचा वापर केला होता. त्यांनी सांगितले की, अनिशने मरण्यापूर्वी हल्लेखोरांची नावे 'राजा' आणि 'अली' अशी सांगितली होती, जे त्यांच्यासोबतच काम करत होते. हल्लेखोरांनी इतकी क्रूरता दाखवली की त्यांच्या गळ्यावर 20-25 वार करण्यात आले.

हे ही वाचा : 'आई मला माफ कर..' बायकोच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; फेसबुक पोस्टमध्ये बायकोवर गंभीर आरोप

'कमावता माणूसच उरला नाही'

या कुटुंबावरचे पित्याचे छत्र आधीच हरपले होते, त्यानंतर मोठा मुलगा अनिशने घराची जबाबदारी स्वीकारली होती. निखिल आणि अनिशच्या निधनानंतर घरात आता फक्त त्यांची वृद्ध माता, एक बहीण आणि अनिशची पत्नी उरली आहे. अनिशला एक वर्षाचा लहान मुलगा असून त्याची पत्नी गरोदर आहे. कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे आणि घरात आता कमवता पुरुष सदस्य उरलेला नाही.

हे ही वाचा : शाळा व्यवस्थापकाचे अश्लील व्हिडिओ आणि लाखो रुपयांची देवाणघेवाण, शिक्षिका आणि प्रियकर विद्यार्थ्याचा कारनामा; नेमकं काय घडलं?

कुटुंबियांची न्यायाची मागणी

घटनेला 3-4 दिवस उलटून गेल्यानंतरही महाराष्ट्र पोलिसांकडून कोणतीही ठोस प्रगती झाली नसल्याने नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप आहे. ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. दोन्ही राज्यांत भाजपचे सरकार असूनही आपल्याला न्यायाची आशा धूसर वाटत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला संरक्षण तसेच उदरनिर्वाहासाठी सरकारी मदत किंवा नोकरी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.