शाळा व्यवस्थापकाचे अश्लील व्हिडिओ आणि लाखो रुपयांची देवाणघेवाण, शिक्षिका आणि प्रियकर विद्यार्थ्याचा कारनामा; नेमकं काय घडलं?
एका खासगी शाळेच्या व्यवस्थापकाला अश्लील व्हिडिओच्या जाळ्यात अडकवून तब्बल 14.5 लाख रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात शाळेतील एक शिक्षिका आणि तिचा प्रियकर असलेला विद्यार्थी यांनी मिळून कट रचला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शाळा व्यवस्थापकाचे अश्लील व्हिडिओ आणि लाखो रुपयांची देवाणघेवाण
शिक्षिका आणि प्रियकर विद्यार्थ्याचा कारनामा
नेमकं काय घडलं?
Crime News : उत्तर प्रदेशातील असंद्रा भागात एका खासगी शाळेच्या व्यवस्थापकाला अश्लील व्हिडिओच्या जाळ्यात अडकवून तब्बल 14.5 लाख रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात शाळेतील एक शिक्षिका आणि तिचा प्रियकर असलेला विद्यार्थी यांनी मिळून कट रचला होता. पोलिसांनी व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत दोघांनाही अटक केली असून, न्यायालयाने त्यांची रवानगी कारागृहात केली आहे.
विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेचे प्रेमसंबंध
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित व्यक्ती असंद्रा येथील एका शाळेचे व्यवस्थापक आहेत. त्यांचे त्याच शाळेतील एका शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध होते. दरम्यान, या शिक्षिकेचे शाळेतच शिक्षण घेणाऱ्या एका पदव्युत्तर विद्यार्थ्याशीही प्रेमसंबंध निर्माण झाले. या दोघांनी मिळून व्यवस्थापकाला लुबाडण्याचा कट रचला आणि त्यांचे काही अश्लील व्हिडिओ व फोटो चोरून तयार केले. या पुराव्यांच्या जोरावर शिक्षिकेने व्यवस्थापकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा : पुणे : प्रियकारासाठी प्रेमात वेडी झालेली आई, पोटच्या मुलाला पाण्यात बुडवून अन् जमिनीवर आपटून मारलं
तीन वर्षांपासून ब्लॅकमेलिंग
गेल्या तीन वर्षांपासून हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुरू होता. बदनामीच्या भीतीने व्यवस्थापकाने वेळोवेळी शिक्षिकेच्या खात्यात एकूण 14 लाख 39 हजार 200 रुपये जमा केले. मात्र, एवढी मोठी रक्कम उकळल्यानंतरही आरोपींची हाव कमी झाली नाही. 8 एप्रिल 2026 रोजी आरोपींनी पुन्हा 2 लाख रुपयांची मागणी केली. लोकलाजेस्तव व्यवस्थापकाने सुरुवातीला 10 हजार रुपये दिले, परंतु उर्वरित 1.90 लाख रुपयांसाठी आरोपींनी त्यांच्यावर दबाव वाढवला आणि पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली.
हे ही वाचा : नववीत शिकणाऱ्या मुलीवर 10 जणांनी केला बलात्कार, मुलीनं स्वत:च सांगितली अत्याचाराची कहाणी
शिक्षिका आणि प्रियकराला अटक
अखेर सततच्या त्रासाला कंटाळून जेव्हा व्यवस्थापकाने दिलेले पैसे परत मागितले, तेव्हा आरोपींनी त्यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या मानसिक त्रासाला कंटाळून व्यवस्थापकाने असंद्रा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. असंद्रा पोलीस निरीक्षक आलोक मणी त्रिपाठी यांनी सांगितले की, पीडिताच्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शिक्षिका आणि तिच्या विद्यार्थी प्रियकराला अटक केली आहे. सध्या दोन्ही आरोपींची रवानगी जेलमध्ये करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.









