'आई मला माफ कर..' बायकोच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; फेसबुक पोस्टमध्ये बायकोवर गंभीर आरोप

मुंबई तक

बीडमधील एका तरुणाने बायकोच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. याआधी तरुणाने फेसबुक पोस्ट लिहित बायकोवर आणि एका हॉस्पिटलवर गंभीर आरोप केले आहेत. तरुणाने फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Beed News
Beed News
google news

बातम्या हायलाइट

point

आई मला माफ कर..

point

बायकोच्या त्रासाल कंटाळून तरुणाची आत्महत्या

point

फेसबुक पोस्टमध्ये बायकोवर गंभीर आरोप

Beed News, योगेश काशिद : बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आई आणि सुरेखा मला माफ करा असं म्हणत बीडच्या परळीतील नागापूर येथील रामेश्वर गव्हाणे या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. सासरच्या लोकांकडून मला सतत त्रास दिला जात आहे, माझी पत्नी नम्रता जाधव यांच्या त्रासाला कंटाळून मी आज टोकाचे पाऊल उचलत असल्याचे रामेश्वर गव्हाणे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मधून सांगितले आहे.

पत्नीने गरोदर असल्याचे नाटक करुन आणि आंबेजोगाई येथील आई हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी करून डॉक्टरांना हाताशी धरत चुकीचे रिपोर्ट बनवले आहेत आणि नंतर गर्भपात झाला म्हणून आम्हाला अडकवण्यासाठी हा प्रकार केला असल्याचे पोस्टमध्ये रामेश्वर गव्हाणेने म्हटले आहे. त्याने आपल्या गावामध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण हळहळ व्यक्त केले जात असून रामेश्वर गव्हाणे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर भावनिक पोस्ट केली आहे.

हे ही वाचा : पुणे : प्रियकारासाठी प्रेमात वेडी झालेली आई, पोटच्या मुलाला पाण्यात बुडवून अन् जमिनीवर आपटून मारलं

रामेश्वर गव्हाणे यांनी केलेली फेसबुक पोस्ट

आई आणि सुरेखा मला माफ करा मी जे गेल्या दोन वर्षांपासून सहन करतो आहे. ते मनाला खूप वेदना देणारे आहे. त्यामुळे मी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. माझ्या बायकोच्या नम्रता जाधव हिच्या त्रासाला कंटाळून मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती माझा प्रचंड मानसिक छळ करत आहे. सद्या ती म्हणत आहे की, मी गरोदर आहे.सात आठवड्याची गरोदर आहे. तिचे उपचार आई नर्सिंग होम अंबाजोगाई येथे सुरू आहेत. तेथील डॉ. सुनिता तोंडगे यांनी बाळाचे टोके सुरू झाले आहेत असे आजच म्हटले आहे. तसा रिपोर्ट दिला आहे. पण तो खोटा रिपोर्ट आणि फेक उपचार त्या करत आहेत. डॉक्टरांना मॅनेज करून माझी बायको माझी फसवणूक करत आहे. वर्षा मराठे गव्हाणे यांनी तिला या कामात मदत केली आहे. परळीच्या गुघे मॅडम यांचे आणि डॉ सुनिता तोंडगे आणि डॉ.गणेश तोंडगे यांच्याकडे सेटिंग लावून ती माझी फसवणूक करत आहे. कारण उद्या जर मी कोर्टात धाव घेतली तर म्हणता येत मुलं राहिलं होतं नंतर गर्भपात झाला. म्हणजे वंध्यत्वाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ती परत आली आहे‌. त्यामुळे आजच माझ्या बायकोची सोनोग्राफी करावी आणि आरोग्य विभागात सुरू असलेला गैरप्रकार थांबवावा ही नम्र विनंती. या प्रकरणातील खोटे रिपोर्ट देणार्या सर्व डॉक्टरांवर सखोल चौकशी करून कारवाई करावी.

हे वाचलं का?