Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका तरुणाचे गावातीलच तरुणीवर प्रेम होते. मात्र त्या तरुणीच्या कुटुंबीयांनी हा प्रतिष्ठेचा विषय केला. त्यांनी त्या तरुणाच्या आईलाच घरातून उचलून नेले आणि गावातील एका गव्हाच्या शेतात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर तिची हत्या केली. उत्तर प्रदेशातील लखीमपूर परिसरातील ही घटना आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : प्रेयसीनं अबोला धरला, प्रियकर स्कूटीवरुन 370 किमीचा प्रवास करुन पोहोचला अन् घडलं भयंकर
'त्या' दिवशी काय घडलं?
मृत महिलेचा मुलगा तेलंगणामध्ये कामाला असून त्याची आई, दोन लहान भाऊ आणि एक दोन वर्षांची बहीण गावात राहत होते. 23 फेब्रुवारी रोजी रात्री एका कौटुंबिक कार्यक्रमातून परतल्यानंतर, मध्यरात्री गावातील शिवतरन नावाचा व्यक्ती आणि त्याच्या साथीदारांनी घरात घुसून महिलेचे जबरदस्तीने अपहरण केले. यावेळी मुलांनी आईला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यालाही जीवे मारण्याची धमकी देऊन पळवून लावले. यानंतर महिलेला एका गव्हाच्या शेतात नेण्यात आले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यानंतर तिची हत्या करण्यात आली.
प्रेमप्रकरणाचा वाद
या भीषण हत्याकांडामागे जुना कौटुंबिक वाद आणि प्रेमप्रकरण कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. मृत महिलेच्या मुलाचे गावातीलच एका मुलीशी प्रेमसंबंध होते, ज्यावरून दोन्ही कुटुंबात वैमनस्य होते. याच वादातून मृत महिलेचा एक अल्पवयीन मुलगा सध्या तुरुंगात आहे. याच रागातून आरोपींनी सूड उगवण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा : जळगाव : प्रेम संबंधातून विवाहितेच्या डोक्यात गोळी घालून स्वतःलाही संपवलं, मुलीनं दार उघडून पाहताच...
पोलिसांनी दखल घेतली नाही
मृत महिलेच्या मुलाने आरोप केला आहे की, 24 फेब्रुवारी रोजीच त्याने याप्रकरणी जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये आणि त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज दिला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच कोणतीही दखल घेतली नाही. शनिवारी सकाळी आरोपी घराबाहेरील गव्हाच्या शेताजवळ वारंवार फेऱ्या मारताना दिसल्याने संशय आला. कुटुंबीयांनी तिथे जाऊन शोध घेतला असता आईचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला.
मुख्य आरोपी अटकेत
घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेऊन पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. 'या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींना लवकरच अटक करून प्रकरणाचा पूर्ण खुलासा केला जाईल,' असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
ADVERTISEMENT











