Lucknow Bench Women Abscond : अलाहाबाद हाय कोर्टाच्या लखनऊ खंडपीठातून एक फिल्मी स्टाईल प्रकरण समोर आले आहे. आपल्या नवऱ्याला गोहत्येच्या खोट्या आरोपात फसवणारी एक महिला आरोपी पोलिसांना हुलकावणी देत कोर्टातून फरार झाली आहे. कोर्टात वकिलांचा गोंधळ सुरु असल्याचा फायदा घेत ही महिला फरार झाली. या प्रकरणी निष्काळजीपणे वागणाऱ्या तीन पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अलिगड मुस्लीम विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएट असलेल्या या महिलेचे इंस्टाग्रामवरुन एका बी.टेक पास तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमाआड येऊ नये म्हणून दोघांनी मिळून गोहत्येच्या खोट्या आरोपात अडकवले होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बहिणीसह प्रियकराचा काटा काढला; भावांनीच घडवून आणलं हत्याकांड, जंगलात 'अशा' अवस्थेत सापडले मृतदेह
नवऱ्याचा अडसर दूर करण्यासाठी रचला कट
या प्रकरणातील आरोपी महिलेचे भोपाळमधील एका बी.टेक झालेल्या तरुणासोबत इंस्टाग्रामवरुन प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमसंबंधांत अडथळा असलेल्या नवऱ्याला दूर करण्यासाठी दोघांनी एक कट रचला होता. पहिल्यांदा, नवऱ्याच्या कारमध्ये तिने दोन किलो मांस ठेवले आणि यानंतर राईट विंग ग्रुपला फोन करुन माहिती दिली. याप्रकरणी नवऱ्याला अटक झाला होती. दुसऱ्या वेळेस, तिने 10 किलो मांस ऑनलाईन ऑर्डर केले. मात्र घरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे तिचा कट उघडकीस आला. यामध्ये ती आपल्या नवऱ्याच्या मोबाईलवरुन ओटीपी शेअर करताना दिसून येत आहे.
पोर्टर अॅप आणि 'थर्ड आय' यांनी गुपित उलगडले
मांस आणणाऱ्या पोर्टरच्या रिसीव्हर नंबरवर फोन केल्यावर पोलिसांना संशय आला. कारण त्याला ऑर्डरची माहिती नव्हती. त्यानंतर पोलिसांनी घरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. या तपासणीत नवऱ्याला अडकवण्यामागे तिचाच हात असल्याचे समोर आले. यानंतर तिच्यासोबत तिच्या प्रियकराला ताब्यात घेण्यात आले. मात्र संधीचा फायदा मिळताच ती फरार झाली.
हे ही वाचा : Govt Job: SBI कडून मोठ्या पदांसाठी भरती, पगाराचा आकडा वाचून थक्कच व्हाल... काय आहे पात्रता?
वकीलांच्या गोंधळाचा फायदा घेऊन झाली फरार
21 जानेवारी रोजी अलाहाबाद हाय कोर्टाच्या लखनऊ खंडपीठातून ही आरोपी महिला फरार झाली आहे. नियमांचा भंग करुन तीन पोलिस वकीलांच्या चेंबरपर्यंत पोहोचले होते. यावर तिथे उपस्थित असलेल्या वकीलांनी आक्षेप नोंदवला. यामुळे त्याठिकाणी जोरदार गोंधळ सुरु झाला. याचाच फायदा उठवत आरोपी महिला फिल्मी स्टाईलने फरार झाली. याप्रकरणी निष्काळजीपणे वागणाऱ्या तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर केस दाखल करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT











