वाराणसी : उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शिवपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेपाळी बाग परिसरात 35 वर्षीय विकास कुमार याचा मृतदेह त्याच्या भाड्याच्या घरात आढळला. विकासने तीन लग्न केली होती आणि आता त्याच्या तिसऱ्या पत्नीवरच त्याच्या हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. विकासचा मृतदेह सापडल्यानंतर त्याची तिसरी पत्नी रिया आणि तिची 10 वर्षीय मुलगी गायब झाल्या आहेत, त्यामुळे तिच्यावर संशय वाढला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ताट, लाटणं, उलाथणं घेऊन बदडलं, तरूणाला घेरून चोपलं...हॉटेल भाग्यश्रीवर पुन्हा काय राडा?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासच्या डोक्यावर जखमेच्या खुणा आढळल्या आहेत. त्याचा मृतदेह रविवारी सकाळी भाड्याच्या घरात आढळला. विकास आणि त्याची तिसरी पत्नी रिया यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघेही एका हॉटेलमध्ये काम करत होते आणि गेल्या काही वर्षांपासून एकत्र राहत होते. मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं असून, मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं.
सहा महिन्यांपूर्वी दुसऱ्या महिलेसोबत राहत होता विकास
विकास मूळचा जौनपूर जिल्ह्यातील हथेरा गावचा रहिवासी होता. तो हॉटेलमध्ये मजुरीचं काम करायचा. त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आणि दोन मुलं अशी तीन आपत्य होती. काही वर्षांपूर्वी त्याने आपले कुटुंब सोडून वाराणसीत भाड्याच्या घरात राहण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने दुसरं लग्न केलं. सहा वर्षांपूर्वी तो एका मुस्लिम महिलेसोबत राहत होता. त्यानंतर त्याने रिया नावाच्या महिलेशी तिसरं लग्न केलं आणि तिच्यासोबत राहत होता.
हे ही वाचा >> 'बहिणीचा नवरा माझ्या बायकोसोबत...', लग्नाच्या 7 दिवसानंतरच पत्नीने केला भलताच खेळ!
विकासची दुसरी पत्नी रीता देवी यांनी थेट तिसरी पत्नी रियावर हत्येचा आरोप केला आहे. रीताने दावा केला की, विकास आणि रिया यांच्यात वारंवार वाद होत होते. हत्येनंतर रियाने घरातील दागिने आणि पैसे घेऊन आपल्या 10 वर्षीय मुलीसह पलायन केलं, असं रीताने म्हटलं आहे.
वाराणसीच्या वरुणा झोनचे डीसीपी प्रमोद कुमार यांनी सांगितलं की, मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलं आहे आणि मृत्यूचं खरं कारण लवकरच समोर येईल. रिया आणि तिची मुलगी गायब असल्यानं त्यांचा शोध घेण्यासोबतच या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असून, लवकरच या हत्येच्या गूढाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
