'तुम रुठी रहो मै मनाता रहो...' गाण्यावर अधिकाऱ्याचं बायकोसोबत नाचकाम, व्हिडिओ केला युट्यूबवर शेअर, आता भोगतोय कर्माची फळं

virla video : लग्नाच्या वाढदिवशी पती-पत्नी नाचत होते. त्याच्या नाचण्याचा व्हिडिओ शूट करण्यात आला होता. तो संबंधित व्हिडिओ हा युट्यूबवर शेअर केल्यानंतर सोशल मीडियावरल प्रचंड व्हायरल झाला. मात्र तो अधिकारी या प्रकरणामुळे अडचणीत आला आहे.

virla video tum ruthi raho main manata raha song

virla video tum ruthi raho main manata raha

मुंबई तक

15 Aug 2025 (अपडेटेड: 15 Aug 2025, 04:02 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लग्नाच्या वाढदिवशी पती-पत्नीचं नाचकाम

point

व्हिडिओ केला शूट अन् युट्यूबवर केला शेअर

point

नेमकं प्रकरण काय?

virla video : लग्नाच्या वाढदिवशी पती-पत्नी नाचत होते. त्याच्या नाचण्याचा व्हिडिओ शूट करण्यात आला होता. तो संबंधित व्हिडिओ हा युट्यूबवर शेअर केल्यानंतर प्रचंड व्हायरल झाला. हे प्रकरण पंजाबमधील मोगा येथील बघणापूर येथील आहे. बीपीओ अधिकाऱ्य़ाने त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर स्पष्टोक्ती दिली आहे. ते म्हणाले की, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात विभागाकडे तक्रार दाखल केली, असं त्या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिले आहे. नेमकं प्रकरण काय आहे त्याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणे हादरलं! तरुणाने महिलेशी ठेवले अनैंतिक संबंध, लेकाच्या तळपायाची आग मस्तकात, भररस्त्याच कोयत्याने सपासप वार, नेमकं काय घडलं?

'तुम रुठी रहो मै मनाता रहो...' या हिंदी गाण्यावर पत्नीसोबत डान्स

बीपीओने त्यांच्या ऑफिसमध्ये 'तुम रुठी रहो मै मनाता रहो...' या हिंदी गाण्यावर पती पत्नीसोबत डान्स केला होता. तेव्हा काहीजणांनी त्यांच्या नाचकामाचा व्हिडिओ बनवला आणि युट्यूबला शेअर केला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं. यामुळे पतीच्या चेहऱ्यावरील आनंदच निघून गेला. संबंधित पोलिसांनी सांगितलं की, हा व्हिडिओ 25 जुलै रोजी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा आहे.

त्यावेळी ते पंचायत निवडणुकीमुळे बघाणापुरात त्यांच्या कुटुंबाक़डे आले होते. तेव्हा ते त्यांच्या पत्नीसोबत नाच काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. मुलांनी सुमारे एका मिनिटचा व्हिडिओ बनवला होता. या सर्व प्रकरणात त्यांनी शिक्षण मंत्र्यांकडे पुनर्विचार करण्याचे आवाहन केले. जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा त्याला त्याचे परिणाम भोगावे लागले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओत अधिकारी त्याच्या पत्नीसोबत नाचताना दिसत आहे. त्याच्या हातात टॉवेल देखील आहे, तो त्याच्या पत्नीला टॉवेलमध्ये पकडून नचतोय.

हे ही वाचा : Independence Day : इंग्रजांनी 14-15 ऑगस्टच्या मध्यरात्रीच भारताकडे सत्ता का सोपवली? शेवटच्या 24 तासात काय काय घडलं?

संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर विभागाचे म्हणणे आहे हे केलेलं गैरवर्तन चुकीचं आहे. याच प्रकरणात सध्या देवी प्रसादला निलंबित करण्यात आले असून नोटीस बजावण्यात आली आहे, या प्रकरणाचा पोलीस पुढील चौकशी करत असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान हल्ली अनेक असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यांच्यावर कसलीलीह कारवाई होत नसल्याचं बोललं जातंय. 

    follow whatsapp