पतीच्या हत्येनंतर थेट तुरुंगात... नंतर नवा बॉयफ्रेंड अन् जेलमधून बाहेर आल्यानंतर सासऱ्यालाच संपवलं...

आरोपी महिला तिच्या पतीची हत्या केल्याच्या प्रकरणात सव्वा पाच वर्षे तरुंगात राहिली होती. त्यानंतर, जेलमध्येच तिचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिने तिच्या सासऱ्यांचा देखील खून केला.

जेलमधून बाहेर आल्यानंतर सासऱ्यालाच संपवलं...

जेलमधून बाहेर आल्यानंतर सासऱ्यालाच संपवलं...

मुंबई तक

• 12:00 PM • 15 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पतीच्या हत्येनंतर गेली जेलमध्ये

point

तुरुंगातच दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध..

point

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केला सासऱ्याचा खून

Crime News: सध्या, आग्रा पोलिकांकडून एका आरोपी महिलेचा तपास सुरू असून संबंधित महिलेवर तिच्या सासऱ्याची हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपी महिलेच्या सासूने सूनेच्या विरोधात FIR दाखल केली असल्याची माहिती आहे. महिलेच्या सासूने तक्रार करताना सांगितलं, याआधी तिच्या सूनेने तिच्या पतीची हत्या केली. त्याच्या आरोपीखाली ती सव्वा पाच वर्षे तुरुंगात राहिली आणि तिथे तिने एक नवीन प्रियकर बनवला. नंतर तुरुंगातून बाहेर आल्यावर तिने तिच्या सासऱ्याची हत्या केली आणि पळून गेली. आता पोलीस दोन्ही फरार आरोपींच्या शोधात असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

स्वत:च्या पतीची केली हत्या अन् तुरुंगात...

ही घटना बमरौली कटारा पोलीस स्टेशन परिसरातील महाल बादशाहीतील असल्याचं समोर आलं आहे. बुधवारी रात्री एका महिलेने तिच्या प्रेमप्रकरणात अडथळा ठरणाऱ्या सासऱ्याची हत्या केली. यामध्ये तिला तिच्या प्रियकराची साथ होती. त्यानंतर त्यांनी सासऱ्याचा मृतदेह बाजरीच्या शेतात फेकून दिल्याचा आरोप आहे. आरोपी महिलेच्या सासूने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्या प्रियकाराच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. 

जेलमध्ये दुसऱ्याच पुरुषासोबत जुळले सूत 

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिला तिच्या पतीची हत्या केल्याच्या प्रकरणात सव्वा पाच वर्षे तरुंगात राहिली होती. त्यानंतर, जेलमध्येच तिचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिने तिच्या सासऱ्यांचा देखील खून केला. एत्मादपूर परिसरातील अगवार गावाची रहिवासी असलेल्या मुन्नी देवी यांनी बमरौली कटारा पोलिस ठाण्यात त्यांच्या सूनेची तक्रार दिली आणि तक्रार करताना त्या म्हणाल्या, "माझी सून बबलीने तिचा प्रियकर प्रेम सिंगसोबत मिळून माझ्या पतीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यांनी त्यांचा मृतदेह बाजरीच्या शेतात फेकून दिला." 

हे ही वाचा: Pm Modi Speech : महागाई लवकरच होणार कमी, जीएसटीच्या दराबाबत मोठा निर्णय, 'या' दिवाळीत मोठी भेट मिळणार

सव्वा पाच वर्षे राहिली तुरुंगात...

बबलीने तिच्या पतीची हत्या केली असून ती त्यासाठी सव्वा पाच वर्षे तुरुंगात असल्याचं सासूने सांगितलं. तुरुंगात असतानाच तिची प्रेम सिंग नावाच्या तरुणासोबत ओळख झाली. त्यानंतर, दोघांचे प्रेमसंबंध जुळले. तुरुंगातून सुटल्यानंतर मागील वर्षभरापासून बबली तिचा प्रियकर प्रेम सिंगसोबत महल बादशाहीमध्ये राहत होती. बबलीचे सासरे तिच्या प्रेमसंबंधाला सतत विरोध करत असल्याचं मुन्नी देवी म्हणजेच बबलीच्या सासूने सांगितलं. तसेच, बबलीचं प्रेम सिंगसोबत राहणं तिच्या सासऱ्यांना नेहमी खटकत होतं.

हे ही वाचा:  "तुला भूतबाधा झालीये, उपचार कर नाहीतर कधीच मूल..." 17 वर्षीय तरुणीला घाबरवलं अन् नंतर बलात्कार...

बबली तिच्या सासऱ्यांना काहीतरी बहाणा सांगून महल बादशाहीमध्ये घेऊन गेली होती. त्यानंतर बबली आणि तिच्या प्रियकराने तिथल्याच बाजरीच्या शेतात सासऱ्यांची गळा दाबून निर्घृण हत्या केली. संबंधित घटनेची महिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि तिथे फॉरेन्सिक टीमने सुद्धा पुरावे गोळा केले. पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी तपास केला. पोलिसांच्या माहितीनुसार, मृताच्या पत्नीने तिची सून बबली आणि तिचा प्रियकर प्रेम सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. 

    follow whatsapp