Father And Uncle Killed NEET Student : गुजरातच्या बनासकांठा येथे एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. येथील एका 18 वर्षांच्या तरुणीने मेडिकल ऐंट्रन्स टेस्ट नीट परीक्षा उत्तीर्ण केली. पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, रिझल्ट घोषित होण्यापूर्वीच विद्यार्थ्यीनीची हत्या करण्यात आली होती.पोलीस उपअधिक्षक सुमन नाला यांच्या माहितीनुसार, विद्यार्थीनी बनासकंठा जिल्ह्यातील रहिवासी होती. 24 जुलै रोजी विद्यार्थीनीच्या मूळगावी तिची हत्या करण्यात आली होती. मुलीच्या हत्येचा आरोप तिचे वडील आणि तिच्या दोन काकांवर लावण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 18 वर्षांची मुलगी ऑल इंडिया मेडिकल एन्ट्रन्स परीक्षेच्या तयारीसाठी पालमपूरमध्ये आली होती.
ADVERTISEMENT
त्यावेळी ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तिने काही महिन्यांपूर्वी नीटची परीक्षा दिली होती. पण ती डॉक्टर व्हायचं की नर्स, याबाबत गोंधळली होती. नुकतचं तिच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत तिला चांगले गुण मिळाले आहेत. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली तीन नातेवाईकांना अटक केली आहे आणि एक जण अजूनही फरार आहे.
हे ही वाचा >> जळगाव हादरलं ! कॅफेत मैत्रिणीसोबत बसला सुलेमान, जमाव आला अन् गुरासाखं मारलं, आई-वडील सोडवायला गेले अन्...
लिव्ह इन रिलेशनशिपचं प्रकरण आलं समोर
थराद पोलिसांनी विद्यार्थीनीचा लिव्ह इन पार्टनर हरेश चौधरी यांच्या तक्रारीच्या आधारावर विद्यार्थीनीचे वडील सेंधाभाऊ पटेल आणि काका शिवरामभाई पटेल विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी शिवरामभाईला अटक केली. हरेश चौधरीने आरोप केला होता की, नातेवाईकांनी विद्यार्थीनीची हत्या केली. कारण ते त्यांच्या नातेसंबंधाच्या विरोधात होते आणि तिचं लग्न दुसऱ्या कुणासोबत लावण्याचा प्रयत्न करत होते.
आधीपासूनच विवाहित होता तरुणीचा लिव्ह इन पार्टनर
एफआयआरनुसार, चौधरी आधीपासून विवाहित आहे आणि त्याला एक मुलगाही आहे. पोलीस उपअधिक्षक सुमन नाला यांनी म्हटलं की, हे अजूनही स्पष्ट झालं नाही की, हरेशने तरुणीला त्याच्या लग्नाबाबत सांगितलं नव्हतं. मे महिन्यात हरेश आणि तरुणी दोघेही अहमदाबादला पळून गेले होते. जिथे त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपसाठी एक फॉर्मल अॅग्रिमेंटवर सही केली होती. त्यानंतर ते मध्यप्रदेश आणि राजस्थानलाही पळाले होते.
हे ही वाचा >> अर्जुन तेंडुलकरने बालपणीच्या मैत्रिणीसोबतच उरकला साखरपुडा... सानिया चंडोक नेमकी आहे तरी कोण?
तरुणीच्या कुटुंबियांवर हत्येचा आरोप
एफआयआरनुसार, मुलीचे वडील आणि काकांनी तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला होता. सुमन नालाने पुढं म्हटलं की, 24 जूनच्या रात्री जेव्हा मुलगी थरादमध्ये शिवरामभाई यांच्या घरी होती. तिथे तिला झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या. जेव्हा ती बेशुद्ध झाली, तेव्हा दोघांनी तिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर हत्येचा गुन्हा लपवण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ADVERTISEMENT
