बायको गेली पळून, नंतर मेहुणीसोबत केलं 'ते' कृत्य! भाचीने पाहिलं म्हणून थेट बोटंच छाटली... नेमकं काय घडलं?

एका 49 वर्षीय व्यक्तीने आपल्या मेहुणीची धारदार शस्त्राने हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. इतकेच नव्हे तर, आरोपीने मृताच्या मुलीची म्हणजेच आपल्या भाचीची बोटंच कापून टाकल्याची माहिती समोर आली आहे.

बायको गेली पळून, नंतर मेहुणीसोबत केलं 'ते' कृत्य!

बायको गेली पळून, नंतर मेहुणीसोबत केलं 'ते' कृत्य!

मुंबई तक

• 01:15 PM • 24 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणाने मेहुणीसोबत केलं निर्घृण कृत्य...

point

भाचीने पाहिलं म्हणून थेट बोटंच छाटली...

Murder Case: दिल्लीच्या ख्याला परिसरातून एक धक्कादायक घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. एका 49 वर्षीय व्यक्तीने आपल्या मेहुणीची धारदार शस्त्राने हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. इतकेच नव्हे तर, आरोपीने मृताच्या मुलीची म्हणजेच आपल्या भाचीची बोटंच कापून टाकल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, त्याने एका नातेवाईक महिलेवर देखील हल्ला केल्याचं समोर आलं आहे. 

हे वाचलं का?

प्रकरणातील आरोपी तरुणाचं नाव  इस्तेखार अहमद उर्फ बब्बू असून त्याच्या मेहुणीचं नाव नुसरत असल्याचं सांगितलं जात आहे. नुसरत आणि तिच्या इतर नातेवाईकांनी आपल्या पत्नीला दुसऱ्याच पुरुषासोबत पळून जाण्यासाठी मदत केल्याचा बब्बूला संशय होता. 

पोलिसांना मिळाली माहिती 

संबंधित घटना पश्चिम दिल्लीच्या ख्याली परिसरातील जेजे कॉलनीमध्ये घडल्याची माहिती आहे. पोलिसांना सकाळी, जवळपास 8:05 वाजताच्या सुमारास, एक PCR कॉल मिळाला. पोलिसांना प्रकरणाची माहिती देणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की गाजियाबाद येथील लोनीमध्ये राहणारा बब्बू हा एक सिक्योरिटी गार्ड असून त्याने घरात घुसून घरातील महिलांवर हल्ला केला. 

छातीवर आणि मानेवर केले वार...

बब्बू सकाळी 7 वाजताच्या सुमारास नुसरतच्या घरी पोहोचला. तो आपल्यासोबत एका टिफिन बॉक्समध्ये धारदार शस्त्र लपवून घेऊन आला होता. नुसरतने आरोपीला चहासाठी विचारलं असता त्याने अचानक तिच्यावर शस्त्राने हल्ला केला. नुसरतच्या छाती आणि मानेवर त्याने बरेच वार केले. याच कारणामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. पीडितेची मुलगी सानियाने आपल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने मुलीवर देखील हल्ला केला आणि तिची बोटं छाटली. त्यानंतर, अकबरी नावाच्या घरातील दुसऱ्या महिलेवर सुद्धा बब्बूने हल्ला केला. 

हे ही वाचा: संपत्तीचा वाद टोकाला पोहोचला! पोटच्या मुलानेच बिझनेस पार्टनरसोबत मिळून... मुंबईतील व्यावसायिकासोबत काय घडलं?

घटनेची माहिची मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि नुसरतचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. प्रकरणातील जखमी सानिया आणि अकबरीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळावरून बब्बूला ताब्यात घेतलं असून हत्येत वापरण्यात आलेलं हत्यार जप्त करण्यात आलं आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 103(1) (खून) आणि 109(1) (खूनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. 

हत्येमागचं नेमकं कारण काय? 

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, बब्बू आणि त्याच्या पत्नीमध्ये बराच काळ कौटुंबिक वाद सुरू होते. याच कारणामुळे ही हत्या करण्यात आली. खरंतर, आरोपीची पत्नी दुसऱ्याच पुरुषासोबत पळून गेली असून नुसरत आणि तिच्या इतर नातेवाईकांनी तिला पळून जाण्यास मदत करण्यात आल्याचा बब्बूला संशय होता. आरोपीने नुसरतवर आपल्या पत्नीला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप केला असल्याची पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआयला माहिती दिली. 

हे ही वाचा: बस स्टँडवर घडली थरारक घटना! भररस्त्यात महिलेवर चाकूने वार अन् मुलगी तर... पतीने पत्नीसोबत असं का केलं?

नुसरत तिच्या घरात एकटीच कमवत होती. तिचे पती तुरुंगात असून ती तिच्या चार मुलींना एकटीच वाढवत आहे. नुसरत पूर्वी नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणजेच सिव्हिल डिफेन्स वॉलेन्टिअर म्हणून काम करत होती. बब्बूच्या वाईट स्वभावामुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली असल्याचं तिच्या नातेवाईकांनी सांगितलं. 

​​​​​​​

    follow whatsapp