Newly Married Couple Viral News : मध्यप्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील उमरी पोलीस ठाणे पोलीस हद्दीतील पुलेह गावात एक खळबळजन घटना घडली आहे. लग्नाच्या चार महिन्यानंतर पतीने पत्नीची हत्या केली. जबर सिंह दोहरे असं या आरोपीचं नाव आहे. दारूच्या नेशत त्याने पत्नी गोल्डीसोबत जबरदस्ती संबंध करण्याचा प्रयत्न केला आणि प्रायव्हेट व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा हट्ट धरला. पत्नी गोल्डीने पतीला विरोध करताच पती जबर सिंहने तिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तो मृतदेहाजवळच झोपला आणि सकाळी उठून वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. तसच पोलीस ठाण्यात पोहचून स्वत:ला सरेंडर केलं.
ADVERTISEMENT
या धक्कादायक प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेचे वडील बीरबल जाटव आणि भाऊ जितेंद्र जाटव यांनी जबर सिंह आणि त्याचे वडील भारतवर हत्येचा आरोप केला आहे.
हे ही वाचा >> धक्कादायक! रस्त्याच्या कडेला बास्केटमध्ये दोन दिवसांचं नवजात अर्भक, चिठ्ठीत लिहिलं मला माफ करा...नेमकं काय घडलं?
त्यांनी दावा केला आहे की, मृत महिलेचं एक बोट कापलेलं होतं. चेहऱ्यावर गंभीर जखमा होत्या.डीएसपी दीपक तोमर यांनी म्हटलंय की, या हत्याप्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. कुटुंबियांच्या तक्रारीनुसार अन्य आरोपींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीआय शिवप्रताप सिंह राजावत यांनी म्हटलंय की, आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
बेडरूमचा नजारा पाहून अनेकांचा थरकाप उडाला
सकाळी बेडरूमचा दरवाजा उघडल्यावर नवरी गोल्डीचा मृतदेह बेडवरच पडला होता. तिचं शरीर थंड पडलं होतं आणि चेहऱ्यावर रक्ताचे सडे होते. बेडशीटवरही रक्त पडलं होतं. भिंतीवरही रक्ताचे डाग लागले होते. रुममध्ये रात्री भयानक हत्या कांड झालंय, अशीच अवस्था त्या बेडरुममध्ये झाली होती.
हे ही वाचा >> शिंदे गटाच्या नगरसेवकाने महिलेवर विनयभंग केल्याचा आरोप, थेट भररस्त्यात तुडवलं
ADVERTISEMENT
