Teacher Affair With Student Viral News : मध्यप्रदेशच्या खंडवा येथे महिला शिक्षिकेचं विद्यार्थ्यासोबत प्रेम जडलं. तिने विद्यार्थ्याला विचारलं-तू माझ्याशी लग्न करशील का? यावर विद्यार्थ्याने असं काही उत्तर दिलं, जे ऐकून शिक्षिकेला मोठा धक्का बसला. त्यानंतर शिक्षिका दु:खी झाली अन् तिने स्वत:चं जीवन संपवलं. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला आणि त्या विद्यार्थ्याला अटक केली. पोलिसांकडून याप्रकरणी कसून तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT
शिक्षिकेच्या घरी नेमकं घडलं तरी काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुनासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथील आयटी कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय महिला शिक्षिकेचं तिच्या विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध सुरु झालं. प्रिया यादव असं या महिला शिक्षिकेचं नाव आहे. प्रियाचं तिचा विद्यार्थी सपन यादवसोबत अफेअर सुरु झालं. पण सपनने प्रियाला लग्नासाठी नकार दिल्यानंतर तिला खूप दु:ख झालं. तिने शुक्रवारी तिच्या राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवलं.
हे ही वाचा >> "जो हिंदीचा विषय आहे, आमच्यासाठी तो...", CM फडणवीसांचं सर्वात मोठं विधान! पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?
त्यानंतर सपनने तिला रुग्णालयात नेलं पण डॉक्टरांनी प्रियाला मृत घोषित केलं. पोलीस तपासात सपनने सांगितलं की, तो नर्मदा नगरमध्ये आयटीआयचं शिक्षण घेतो. प्रिया तिथे गेस्ट टीचर म्हणून शिकवायची. शिक्षण घेत असताना दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु झाले. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. दोघांचा मागील एक वर्षापासून अफेअर सुरु होतं.
लग्नाचं प्रपोजल ठेवलं पण नंतर घडलं..
शुक्रवारी प्रियाने सपनला तिच्या घरी बोलावलं. त्यावेळी प्रियाने सपनला लग्नाबाबत विचारलं. यावर सपनने म्हटलं की, त्याला आधी करिअर करायचं आहे. त्यानंतरच तो लग्न करेल. हे ऐकून प्रिया नाराज झाली. तिने तिचा फोन जमिनीवर आपटला आणि रुममध्ये गेली. जवळपास अर्धातास ती रुममध्येच होती. तेव्हा सपनने छतावर जाऊन रुमच्या खिडकीतून पाहिलं, तेव्हा रुममधील दृष्य थक्क करणार होतं. प्रियाने गळफास घेतला होता. तसच प्रियाने एक सुसाईट नोटही लिहिलं होतं. यामध्ये तिने कोणाचंही नाव लिहिलं नव्हतं. दरम्यान, पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
हे ही वाचा >> मेहुणीचं भाऊजींवर जडलं प्रेम! बहिणीनं दोघांनाही नको त्या अवस्थेत पाहिलं..नंतर झाला राडा!
ADVERTISEMENT
