सोनम-मुस्कानपेक्षाही खतरनाक निघाली सुमंगला! डोळ्यात मिरची पावडर टाकून पतीचा गेमच केला, पोत्यात मृतदेह भरला अन्..

मुंबई तक

29 Jun 2025 (अपडेटेड: 29 Jun 2025, 05:55 PM)

Wife Kills Husband Viral News : इंदौरच्या सोनम रघुवंशीने हनिमूनला गेल्यावर पती राजा रघुवंशीची निर्घृण हत्या केली होती. तर गाजियाबादच्या मुस्कानने नवऱ्याचा मृतदेह सिमेंटच्या निळ्या ड्रममध्ये पुरला होता.

Wife Kills Husband Shocking Murder Case

Wife Kills Husband Shocking Murder Case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

डोळ्यात मिरची पावडर टाकून पत्नीने पतीला संपवलं!

point

विवाहबाह्य संबंधांमुळे घडली भयंकर घटना

point

पोत्यात भरून पतीचा मृतदेह बाहेर फेकला अन् नंतर..

Wife Kills Husband Viral News : इंदौरच्या सोनम रघुवंशीने हनिमूनला गेल्यावर पती राजा रघुवंशीची निर्घृण हत्या केली होती. तर गाजियाबादच्या मुस्कानने नवऱ्याचा मृतदेह सिमेंटच्या निळ्या ड्रममध्ये पुरला होता. या घटना ताज्या असतानाच आता कर्नाटकमध्येही खळबळजनक घटना घडली आहे. येथील सुमंगला नावाच्या महिलेनं प्रियकरासोबत मिळून तिच्या 50 वर्षांच्या पतीची हत्या केली.

हे वाचलं का?

शंकरमूर्ती असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे सुमंगलाने पतीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि नंतर त्याला लाठ्या काठ्यांनी मारहाण केली आणि गळा दाबून पतीची हत्या केली. सुमंगलाने पतीचा मृतदेह पोत्यात टाकला आणि घराच्या बाहेर फेकून दिला. 

फार्महाऊसवर पतीची केली हत्या अन्..

कर्नाटक पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना 24 जूनला घडली. तुमकुरु जिल्ह्याच्या टिपटूर तालुक्यातील कडाशेट्टीहल्ली गावात शंकरमूर्ती एका फार्महाऊसवर एकटा राहत होता. त्यांची पत्नी सुमंगला गर्ल्स हॉस्टेलमध्ये काम करायची. पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेचं नागराजू नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. सुमंगलाच्या अफेअयरबाबत तिच्या पतीला कळलं. त्यानंतर पत्नी सुमंगलाने पती शंकरमूर्तीच्या हत्येचा कट रचला. 

हे ही वाचा >> पन्नास लाख रुपये देऊन सासरच्यांनी सूनेचा छळ केला, हत्येमागचं धक्कादायक कारण आलं समोर

पोलिसांच्या माहितीनुसार, सुमंगलाने तिच्या पतीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर त्याला लाकडी दांडकाने मारहाण केली आणि गळा दाबून त्याची हत्या केली. नंतर मृतदेह पोत्यात भरून दूरवर असलेल्या एका शेतातील विहिरीत फेकला. शंकरमूर्ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरात कसून तपास केला.

त्यादरम्यान, पोलिसांना मिरची पावडरचे शिक्के दिसले. त्यानंतर मोबाईल कॉल डिटेल्स रेकॉर्डवरून पोलिसांना हे हत्येचं प्रकरण असल्याचं समजलं. पोलिसांनी सुमंगलाची कसून चौकशी केल्यानंतर तिने गुन्हा कबूल केला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. 

हे ही वाचा >> थोडी थोडकी नाही, तब्बल 3 कोटींची फसवणूक... पार्सलमध्ये ड्रग्ज सापडलं म्हणत, डिजिटल अरेस्टच्या नावानं गंडवलं