थोडी थोडकी नाही, तब्बल 3 कोटींची फसवणूक... पार्सलमध्ये ड्रग्ज सापडलं म्हणत, डिजिटल अरेस्टच्या नावानं गंडवलं
पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, महिलेने दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 3.04 कोटी रुपये हस्तांतरित केले. ठाणे पोलिस उपायुक्त पराग मानेरे यांनी सांगितले की, आरोपींनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा आव आणून पीडितेचा विश्वास कसा संपादन केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिलेती तब्बल 3 कोटींची फसवणूक
डिजिटल अरेस्ट वाल्या फसव्यांचा सुळसुळाट सुरूच
ठाणे : ठाणे पोलिसांनी एका 61 वर्षीय वृद्ध महिलेला "डिजिटल अरेस्ट"च्या नावाखाली 3.04 कोटी रुपये लुटणाऱ्या आंतरराष्ट्रीय फसवणूक टोळीतील तीन आरोपींना अटक केली आहे. ही माहिती पोलिसांनी रविवारी (29 जून 2025) दिली.
पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचा दावा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ऑगस्ट 2024 रोजी काही व्यक्तींनी कुरिअर कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून पीडित महिलेला फोन केला आणि तिचा एक पार्सल जप्त केल्याचा दावा केला. या पार्सलमध्ये लॅपटॉप, 140 ग्रॅम एमडी (ड्रग) पावडर, थाई पासपोर्ट, तीन क्रेडिट कार्ड आणि चार किलोग्रॅम कपड्यांचा समावेश असल्याचे सांगितले. त्यानंतर लगेचच एका व्यक्तीने स्वतःला "सीबीआय अधिकारी" म्हणवून महिलेला ओळख पडताळणीसाठी दुसऱ्या नंबरवरून कॉल केला. पोलिसांच्या मते, या ठगांनी बनावट कागदपत्रे दाखवून पीडितेला "डिजिटल अरेस्ट" केले आणि तिला पैसे हस्तांतरित करण्यास भाग पाडले.
हे ही वाचा >> पन्नास लाख रुपये देऊनही सासरच्यांनी सूनेचा छळ करत केला खून, कारण आलं समोर
पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, महिलेने दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 3.04 कोटी रुपये हस्तांतरित केले. ठाणे पोलिस उपायुक्त पराग मानेरे यांनी सांगितले की, आरोपींनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा आव आणून पीडितेचा विश्वास कसा संपादन केला, यातून त्यांचे धाडस स्पष्ट होते.
या प्रकरणी 13 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4) (फसवणूक), 316(5) (आपराधिक विश्वासघात), 336(3) (जालसाजी) आणि 340(2) (बनावट कागदपत्रे किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड खरे म्हणून वापरणे) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींखाली गुन्हा दाखल करण्यात आला.










