Crime : मित्राच्या बायकोसोबत संबंध अन् झाला भयंकर अंत, तिसऱ्या मजल्यावरून…

मुंबई तक

07 Jul 2023 (अपडेटेड: 07 Jul 2023, 01:25 PM)

आपल्याच मित्राच्या पत्नीच्या प्रेमात पडल्यामुळे तरुणाला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या पतीने साथीदारांसह पत्नीच्या प्रियकराला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले.

the accused confessed that the deceased Abdul Sahroj had an illicit relationship with the wife of the accused Hannan.

the accused confessed that the deceased Abdul Sahroj had an illicit relationship with the wife of the accused Hannan.

follow google news

Crime News : मित्राच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध ठेवणं तरुणासाठी जीवघेणं ठरलं. मित्राचे आणि आपल्या बायकोचे संबंध असल्याचे कळल्यानंतर जे घडलं, जे घडलं ते अत्यंत धक्कादायक होतं. गुरुग्राममध्ये ही घटना घडली असून, पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. यात त्याच्या मित्राचाही समावेश आहे. (wife’s illegitimate relationship, husband killed wife’s lover)

हे वाचलं का?

आपल्याच मित्राच्या पत्नीच्या प्रेमात पडल्यामुळे तरुणाला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या पतीने साथीदारांसह पत्नीच्या प्रियकराला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. 26 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

वाचा >> Crime : दगडाने ठेचून मारण्यापूर्वी साक्षीसोबत कुणी ठेवले शारीरिक संबंध?

एसीपी क्राइम वरुण दहिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलै रोजी सेक्टर-१७/१८ पोलीस स्टेशनला सिरहोळ गावात एक व्यक्ती छतावरून पडल्याची माहिती मिळाली होती. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि तरुणाला उपचारासाठी सेक्टर-10 सरकारी रुग्णालयात दाखल केले, तेथे 26 वर्षीय अब्दुल सहरोजचा मृत्यू झाला.

पतीने घेतला पत्नीच्या प्रियकराचा बदला

या अपघातानंतर मृत अब्दुल सहरोजचे मामा मोहम्मद आसिफ यांनी पोलिसांना सांगितले की, त्याचा भाचा सिरहोळ गावात राहत असून, तो ग्लास अॅल्युमिनियम फॅब्रिकेटिंगचे काम करत असे. त्याच्या पुतण्याचे सिरहोळ गावातीलच एका महिलेशी अवैध संबंध होते.

वाचा >> अजित पवारांच्या बंडामुळे सुप्रिया सुळेंचं वाढलं टेन्शन, ‘हे’ असेल मोठं आव्हान

4 जुलै रोजी रात्री त्यांचा भाचा महिलेला भेटण्यासाठी गेला होता. एका तरुणाने अब्दुलला आपल्यासोबत एका खोलीत नेले आणि तेथे तीन जणांनी त्याच्यावर हल्ला केला आणि अब्दुलला तीन मजली इमारतीवरून खाली फेकले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

खून अपघातासारखा दिसतो

पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, तीन आरोपींना सरहौल गावातून अटक केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आलमदीन हुसेन, बिलाल हुसैन आणि हन्नान अशी आरोपींची नावे आहेत.

वाचा >> NCP: ‘साहेबांचं वय काय बघता, डोकं तेच आहे..’, रोहित पवारांकडून अजितदादांना चॅलेंज

चौकशीत मयत अब्दुल सहरोजचे आरोपी हन्नानच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते, त्यामुळे त्याने त्याच्या दोन साथीदारांसह हत्या केल्याची कबुली हन्नानने दिली. पोलीस पथकाने आरोपीच्या ताब्यातून मृताचा मोबाईल फोन आणि बूटही जप्त केले आहेत.

मैत्रिणीला भेटायला गेला अन् जीवच गेला

एसीपी वरुण दहिया यांनी सांगितले की, अब्दुल 4 जुलैच्या रात्री महिलेला भेटायला गेला होता. त्यानंतर एका तरुणाने अब्दुलला आपल्यासोबत एका खोलीत नेले आणि तेथे 3 जणांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि अब्दुलला तीन मजली इमारतीवरून खाली फेकले. खाली पडल्यामुळे तो जबर जखमी झाला आणि जागेवरच मृत्युमुखी पडला.

    follow whatsapp