Baramati : अजित पवारांच्या बंडामुळे सुप्रिया सुळेंचं वाढलं टेन्शन, ‘हे’ असेल आव्हान

मुंबई तक

ADVERTISEMENT

There are six assembly constituencies in the Baramati Lok Sabha constituency. Means there are 6 MLAs here. Out of this only 2 are from NCP.
There are six assembly constituencies in the Baramati Lok Sabha constituency. Means there are 6 MLAs here. Out of this only 2 are from NCP.
social share
google news

Politics of Maharashtra : अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याविरोधात बंडखोरी केली. अजित पवार आपल्या समर्थक नेत्यांना घेऊन वेगळे झाले आणि भाजपसोबत घरोबा केला. त्यामुळे अजित पवार गट आणि शरद पवार गट, असे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता दोन गट पडले आहेत. मात्र या राजकीय उलथापालथीमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झाले आहे. (Supriya Sule’s tension increased due to brother Ajit Pawar’s rebellion)

बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. म्हणजे येथे 6 आमदार आहेत. यापैकी केवळ 2 राष्ट्रवादीचे आहेत. एक अजित पवार आणि दुसरे इंदापूरचे आमदार दत्ता भरणे. सध्या दत्ता भरणे अजित पवारांच्या गटात आहेत. उर्वरित 4 पैकी 2 भाजपचे तर 2 काँग्रेसचे आमदार आहेत. खडकवासला मतदारसंघातून भाजपचे भीमराव तापकीर, तर राहुल कुल हे दौंड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. पुरंदर मतदारसंघातून काँग्रेसचे संजय जगताप तर भोर विधानसभा मतदारसंघातून संग्राम थोपटे आमदार आहेत.

भाजपचे लक्ष बारामतीवर

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत 45 हून अधिक जागा जिंकण्याचा प्लॅन भाजपने तयार केला आहे. यासाठी पक्षाने काही हायप्रोफाईल मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. हे मतदारसंघ गेल्या निवडणुकीपर्यंत भाजपसाठी आव्हानात्मक राहिले आहेत. यामध्ये बारामती ही प्रमुख जागा असून, तेथे भाजपने अनेक दिवसांपासून लक्ष केंद्रित केले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> ‘धनंजय मुंडेंना तेव्हा मीच सांगितलेलं भाजप सोडू नका…’, अजित पवार का होतायेत ट्रोल?

अगदी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतर केंद्रीय नेत्यांनीही अलीकडच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघाला अनेकदा भेटी दिल्या आहेत. त्यांनी भाजपची धोरणे शेतकरी, महिला आणि तरुणांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला. एवढेच नाही तर बारामती लोकसभा मतदारसंघातील डॉक्टर, शिक्षक आणि अभियंता यांचीही भाजप नेते बैठक घेत आहेत.

1967 पासून बारामती विधानसभा मतदारसंघ पवार कुटुंबाकडे आहे. तर 1991 पासून बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवार कुटुंबाचा अभेद्य बालेकिल्ला राहिला आहे.

ADVERTISEMENT

शरद पवारांसाठी अजित पवारांनी सोडली होती ही जागा

1991 मध्ये अजित पवार बारामतीत लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र, काही काळानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. खरंतर ही जागा त्यांनी काका शरद पवार यांच्यासाठी सोडली होती. अजित यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी तेथून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर 2004 पर्यंत ते या जागेवरून निवडणूक लढवत राहिले.

ADVERTISEMENT

वाचा >> NCP: अजितदादांचं बंड, पवारांसोबत सावली सारखे राहणाऱ्या रोहित पवारांची स्फोटक मुलाखत जशीच्या तशी!

त्यानंतर 2009 चे वर्ष आले. तेव्हापासून सुप्रिया सुळे बारामतीचे प्रतिनिधित्व करत आहेत. गेल्या निवडणुकीत अजित पवारांच्या बारामती विधानसभेत त्यांना 1 लाखांहून अधिक मतांची आघाडी मिळाली होती. 1 लाख 50 हजार मतांच्या फरकाने त्यांचा विजय झाला होता.

अजित पवारांचं बंड अन् बदलेली समीकरणं

आता अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने मतांची विभागणी सुप्रिया सुळेंना जड जाऊ शकते. अजित पवारांच्या गटात सहभागी न झालेले शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना इंडिया टुडेने हाच प्रश्न विचारला. ते म्हणाले की, बारामतीची जनता खूप हुशार आहे, ते आमचे काम खूप दिवसांपासून पाहत आहेत. बारामती विधानसभेत अजित पवार यांचा कोणीही पराभव करू शकत नाही आणि लोकसभेत लोक हुशारीने मतदान करतील, असे मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो.

हे मतदारसंघ गेम चेंजर्स ठरू शकतात

गेल्या लोकसभा निवडणुकीत दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवली आणि त्यांना 5 लाख 30 हजार 940 मते मिळाली. त्यांनी सुळे यांना कडवी झुंज दिली.

वाचा >> ‘आव्हाडांसह 2-3 जण प्रफुल्ल पटेलांवर तुटून पडले’,छगन भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी

बारामती लोकसभा मतदारसंघात शहरी मतदारांची संख्या जास्त आहे. पुणे शहरातील अनेक भाग बारामती लोकसभेत समाविष्ट आहेत. यामध्ये खडकवासला, कोथरूड आणि कात्रजचाही समावेश आहे. आणि हे लोकसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरू शकतात.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT