Crime news: उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे लग्न झाल्याच्या केवळ एका वर्षानंतर संबंधित महिलेचा गळा चिरून तिची निर्घृण हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. हत्येनंतर, आरोपीने त्या महिलेचा मृतदेह खोलीत लपवून ठेवला. प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
खोलीत पत्नीचा मृतदेह...
संबंधित प्रकरण हे नवाबंगजच्या ओम सिटी कॉलनीमधील असल्याची माहिती आहे. मंगळवारी (28 ऑक्टोबर) येथे राहणाऱ्या अनीता नावाच्या महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली. मृत महिलेचा पती ट्रॅक्टर चालक असल्याचं सांगण्यात येत आहे. संध्याकाळच्या सुमारास आरोपी अनिल त्याच्या घरी पोहोचल्यानंतर, दरवाजाला कुलूप असल्याचं त्याने पाहिलं. त्यावेळी, त्याने आसपासच्या लोकांकडे अनीताबद्दल विचारपूस केली. पत्नीबाबत कोणतीच माहिती मिळाली नसल्याने पती कुलूप तोडून घरात घुसला आणि त्यावेळी त्याला खोलीत अनीताचा मृतदेह दिसला. तिची गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी, घरातील सामान सुद्धा अस्ता-व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं. खरं तर, ही एक चोरीची घटना असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तपास केला असता घरातून कोणतंच सामान गायब नसल्याचं आढळून आलं. पोलिसांच्या माहितीनुसार, अनीताच्या माहेरच्या लोकांनी तिच्या पती, सासू, सासरे, दीर या सासरच्या लोकांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा: चुलत भावाने 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर केला बलात्कार! विरोध केला असता मारहाण केली अन् घराच्या छतावरून...
पीडितेच्या घरच्यांनी दिली माहिती
अनीताचं वर्षभरापासून अनिलसोबत लग्न झालं असल्याचं पीडितेच्या भावाने सांगितलं. त्याने पुढे सांगितलं की, लग्नात 14 लाख रुपये खर्च करून सुद्धा अनीताच्या सासरची मंडळी समाधानी नव्हती. अनीता ही त्याचा पती अनील आणि दीरासोबत ओम सिटी कॉलनीमध्ये राहत होती. लग्नानंतर, सासरचे लोक अनीतावर माहेरकडून कार आणण्यासाठी दबाव आणायचे. यानंतर, पीडित महिलेने तिच्या सासरच्या लोकांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण, तिला सासरच्या घरातून बाहेर काढण्यात आलं. दोन्ही कुटुंबियांमध्ये चर्चा झाल्यानंतर ती पुन्हा तिच्या सासरी गेली. मंगळवारी सकाळी अनिलने पीडितेच्या आईला फोन करून अनीता घरी नसल्याचं सांगितलं. ती माहेरच्या घरी सुद्धा गेली नसल्याने तो घरी थेट घरी पोहोचला आणि त्यानंतर त्याला खोलीत अनीताचा मृतदेह आढळला.
हे ही वाचा: अनैतिक संबंधाच्या आड येत होती 7 वर्षांची मुलगी; प्रियकराने मुलीसोबत केलं निर्घृण कृत्य अन् विवाहित प्रेयसीला...
आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून मारहाणीची कोणतीच चिन्हे नसल्याने पीडितेला नशेचं औषध देऊन तिची गळा चिरून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT











