हॉटेलच्या छतावरून नग्न अवस्थेत खाली पडली तरुणी... पोलिसांनी ‘त्या’ खोलीत पोहोचताच पाहिलं धक्कादायक दृश्य!

एका हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून एक तरुणी नग्न अवस्थेत खाली पडली. यामध्ये पीडिता गंभीररित्या जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे.

हॉटेलच्या छतावरून नग्न अवस्थेत खाली पडली तरुणी

हॉटेलच्या छतावरून नग्न अवस्थेत खाली पडली तरुणी

मुंबई तक

• 04:06 PM • 29 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

हॉटेलच्या छतावरून नग्न अवस्थेत खाली पडली तरुणी...

point

पोलिसांनी ‘त्या’ खोलीत पोहोचताच पाहिलं धक्कादायक दृश्य!

Crime News: मंगळवारी (28 ऑक्टोबर) उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एक धक्कादायक घटना घडली. येथील एका हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून एक तरुणी नग्न अवस्थेत खाली पडली. यामध्ये पीडिता गंभीररित्या जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना शास्त्रीपुरमच्या आरवी लोधी कॉम्प्लेक्समधील 'द हेवन' हॉटेलमध्ये घडली.

हे वाचलं का?

चादर पांघरून रुग्णालयात नेलं 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिच्यावर चादर पांघरून तिला ताबडतोब रुग्णालयात नेलं. दरम्यान, तरुणीचा साथीदार आणि हॉटेल कर्मचारी घटनास्थळावरून पळून गेल्याचा आरोप आले. त्यानंतर पोलिसांनी लगेच तपास सुरू केला आणि हॉटेल मालकाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी खोलीची सजावट 

संबंधित प्रकरण हे सिकंदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या आरवी लोधी कॉम्प्लेक्समधील ‘द हेवन’ हॉटेलमधील असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेत गंभीर पद्धतीने जखमी झालेल्या तरुणीला पश्चिमपुरी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांच्या तपासात बरेच महत्त्वाचे धागेदोरे समोर आल्याची माहिती आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान, हॉटेलच्या खोली क्रमांक 4 मध्ये फुगे आणि बर्थडेसाठी सजावट केल्याचं आढळून आलं. त्यामुळे ही खोली वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी सजवण्यात आली असल्याचा संशय पोलिसांच्या मनात निर्माण झाला.

हे ही वाचा: पत्नीचा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याला विरोध! संपातलेल्या पतीने थेट घराच्या छतावरून खाली फेकलं अन्...

रूमच्या भिंतीवर सुद्धा ‘हॅप्पी बर्थडे' असे लिहिलेलं आढळलं आणि उर्वरित खोल्या अस्ताव्यस्त होत्या. पीडित तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आली होती आणि त्याच दरम्यान ही भयानक घटना घडल्याचा पोलिसांना संशय आहे.

हे ही वाचा: ठाणे: गर्लफ्रेंडसोबत झाला वाद, प्रियकराने प्रेयसीच्या घरात घुसून जिवंत जाळलं.. कुटुंबीय घरी पोहोचले अन्...

पोलिसांचा तपास  

या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच, सहाय्यक पोलिस अधीक्षक सुद्धा तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या प्रकरणाबाबत सांगितलं की, घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं आहे. तसेच, या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी तातडीने कारवाई करत हॉटेल मालकाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू केली आहे. याव्यतिरिक्त, पोलीस आसपासच्या लोकांची सुद्धा चौकशी करत आहेत आणि हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या घटनेमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी पोलिसांनी मुलीच्या फरार साथीदाराचा आणि हॉटेलच्या इतर कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.

    follow whatsapp