Crime News: उत्तर प्रदेशातून गोरखपुरमध्ये प्रियकर आणि प्रेयसीने ट्रेनसमोर उडी मारून आपलं आयुष्य संपवल्याची बातमी समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तरुणीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर नग्न अवस्थेत सापडला आणि तिच्या बाजूलाच तिच्या प्रियकराचा मृतदेह आढळला. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. प्रियकर आणि प्रेयसीच्या आत्महत्येमागील नेमक्या कारणाचा पोलीस तपास करत आहेत. 21 वर्षीय विश्वकर्मा कुमार अशी मृत तरुणाची ओळख पटली असून तो पिपराइच पोलिस स्टेशन परिसरातील वॉर्ड क्रमांक 11 चा रहिवासी होता. 18 वर्षीय मृत तरुणी सुद्धा त्याच शहरातील रहिवासी होती. ही संपूर्ण घटना पिपराइच पोलीस स्टेशन हद्दीत घडली.
ADVERTISEMENT
एकत्र ट्रेनसमोर उडी मारली...
दोघांनी एकमेकांचे हात हातात धरून ट्रेनसमोर उडी मारल्याचं म्हटलं जात आहे. घटनेत मुलीचा पाय पूर्णपणे तुटला होता, तसेच तरुणाच्या डोक्याला दुखापत झाली होती. जेव्हा दोघांनी एकत्र रेल्वे रुळावर उडी मारली तेव्हा लोको पायलटने अचानक ब्रेक लावला आणि ट्रेन थांबली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यानंतर लोको पायलटने लगेच पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. तसेच, त्यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.
कुटुंबियांना दिली माहिती
घटनेपूर्वी, दोघे पिपराइच रेल्वे स्टेशनवर बराच वेळ चालत होते. पीडिता एका कपड्यांच्या दुकानात काम करत असून दुकानातून बाहेर पडल्यानंतर ती सोमवारी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी स्टेशनवर आली होती, असं प्राथमिक तपासात दिसून आलं. त्यानंतर दोघेही प्लॅटफॉर्मवर बराच वेळ गप्पा मारत होते. रात्री 9:30 च्या सुमारास, रेल्वे रूळावर ट्रेन येत असल्याचं पाहून त्यांनी एकमेकांचे हात धरले आणि ट्रेनसमोर उडी मारली. दोघेही ट्रेनच्या कचाट्यात सापडल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून मुलीचा मोबाईल फोन जप्त केला. त्यानंतर, तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली.
हे ही वाचा: ठाणे: गर्लफ्रेंडसोबत झाला वाद, प्रियकराने प्रेयसीच्या घरात घुसून जिवंत जाळलं.. कुटुंबीय घरी पोहोचले अन्...
पोलिसांकडून माहिती मिळताच, पीडित तरुणीची आई घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी तरुणाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. संबंधित तरुणी गेल्या तीन वर्षांपासून एका कपड्याच्या दुकानात काम करत होती, अशी माहिती आहे.
हे ही वाचा: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना किती जागा लढणार? मंत्र्यांच्या बैठकीतून आकडा समोर
पीडित तरुणाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, मुलीने आदल्या दिवशी त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर फोन केला होता. त्यानंतर त्यांचा मुलगा घराबाहेर पडला आणि परतलाच नाही. काल रात्री उशिरा त्यांना त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यांनी सांगितलं की, तरुण आणि तरुणी प्रेमसंबंधात असून त्यांना एकमेकांसोबत लग्न करायचं होतं. मात्र, पीडितेच्या आईचा त्यांच्या नात्याला विरोध होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, त्या दोघांनी सहा महिन्यांपूर्वी सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT











