Crime News: एका तरुणाने आपल्या 17 वर्षांच्या चुलत बहिणीसोबत घृणास्पद कृत्य केल्याची संतापजनक बातमी समोर आली आहे. इतकेच नव्हे तर, पीडितेने आरोपी भावाला या कृत्यासाठी विरोध केला असता त्याने पीडितेला घराच्या छतावरून खाली फेकल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित घटना ही गाझियाबाद येथील मोदीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात घडल्याची माहिती आहे. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, बुधवारी (29 ऑक्टोबर) आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
घराच्या छतावरून खाली पडली अन्...
पीडित तरुणी ही मोदीनगर येथील एका गावात तिच्या कुटुंबियांसोबत राहत होती. 20 ऑक्टोबरच्या रात्री पीडित तरुणी ही तिच्या घराच्या गच्चीवर झोपली होती. पण, रात्री घरातील सर्व सदस्य झोपलेले असताना अचानक पीडिता खाली पडली. मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून घरच्यांना सुद्धा जाग आली आणि ते लगेच घराबाहेर पोहोचले. मुलगी गच्चीवरून खाली पडल्याने ती गंभीर दुखापत झाल्याचं कुटुंबियांनी पाहिलं आणि तिला तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, प्रकृती आणखी गंभीर झाल्याने पीडितेला मेरठ रुग्णालयात रेफर केलं गेलं.
हे ही वाचा: अनैतिक संबंधाच्या आड येत होती 7 वर्षांची मुलगी; प्रियकराने मुलीसोबत केलं निर्घृण कृत्य अन् विवाहित प्रेयसीला...
बहिणीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
उपाचारदरम्यान, पीडितेला शुद्ध आल्यानंतर तिने घडलेल्या घटनेबाबत सांगितलं. ती म्हणाली, की ती घराच्या गच्चीवर झोपली होती. पीडिता झोपलेली असताना अचानक तिथे तिच्या आत्याचा मुलगा आला आणि त्याने आपल्या बहिणीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या घृणास्पद कृत्याला पीडितेने विरोध केल्यानंतर त्या तरुणाने तिला बेदम मारहाण केली आणि तिला छतावरून खाली फेकलं. त्यानंतर, आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
हे ही वाचा: गंजलेल्या नंबर प्लेटची स्कुटी घेऊन फिरणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला 2 हजारांचा दंड, व्हायरल व्हिडीओतील 'त्या' तरुणाला यश
इतकेच नव्हे तर, आरोपी तरुण पीडितेसोबत 8 वर्षांपासून घृणास्पद कृत्य करत असल्याचं तिने सांगितलं. पोलिसांच्या मते, आता पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची प्रतिक्षा आहे, जेणेकरुन तिचा जबाब नोंदवला जाईल. पीडिता 9 वर्षांची असताना आरोपीने तिच्यासोबत पहिल्यांदा असं वाईट कृत्य केलं होतं. त्यानंतर, तो पीडितेच्या वडील आणि भावाला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्ती करायचा. या सगळ्याला विरोध केल्यानंतर पीडितेला आरोपीकडून मारहाण सुद्धा करण्यात आली. घाबरून पीडितेने याबाबत घरातील सदस्यांना सांगितलं नव्हतं.
ADVERTISEMENT











